शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर बोेलण्याच्या कारणावरून आईचाच मुलावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:37 IST

फोनवर कीती बोलतेस असे विचारल्याचा राग आल्याने मध्यरात्री भर झोपेत असताना आईने मुलाचे तोंड दाबून चाकूने वार केल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली

नेवासा : फोनवर कीती बोलतेस असे विचारल्याचा राग आल्याने मध्यरात्री भर झोपेत असताना आईने मुलाचे तोंड दाबून चाकूने वार केल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गिडेगाव येथे मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला असून जखमी झालेल्या विशाल दीपक साळुंखे (वय-१८) गंभीर जखमी झाला आहे.विशाल साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची आई शोभा दीपक साळुंखे हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. सोमवार (दि.१५) रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी शोभा ही फोनवर बोलत होती. त्यावेळी विशालने तिला हटकले. ‘किती वेळ फोनवर बोलतेस,’ असे विचारले. तेव्हा आई शोभा हिने ‘मी कीतीपण वेळ बोलेल. तुला काय करायचे, असे रागाने म्हणाली. त्यानंतर विशाल जेवण करून बाहेर अंगणात झोपलेला असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे कोणी तरी तोंड दाबले. त्याला जाग आली तेव्हा आईनेच त्याचे तोंड दाबलेले कळाले. त्याला काही कळायच्या आत आईने हातातील चाकूने कानाखाली व तोंडावर वार करत होती. विशाल ने हाताने चाकू धरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातावर वार केला. तुझ्यात किती बळ आहे ते पाहतेच, असे म्हणत आईचा मुलावर हल्ला सुरुच होता. विशालने कशी तरी सुटका करून घेतली. त्यानंतर गळनींब येथील आत्या संगिता दिगबंर शेळके यांना फोन करून बोलावून घेतल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलवरील बोलण्याच्या किरकोळ कारणावरून आईनेच मुलावर थेट चाकू हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसNevasaनेवासा