शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषदेत १ हजारांहून अधिक पदांची होणार भरती

By चंद्रकांत शेळके | Updated: April 20, 2023 16:21 IST

शासनाने ही परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या कंपनीची निवड केली असून कंपनीकडून ॲप्लिकेशन पोर्टल विकसित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

अहमदनगर : गेल्या चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. शासनाने मागील आठवड्यात सर्व जिल्हा परिषदांना सूचना देत भरतीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील १ हजारांहून अधिक पदांची भरती होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १२ एप्रिल २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भरतीबाबत सूचना दिल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात १५ ॲागस्ट २०२३ पूर्वी शासनाला राज्यात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरायची आहेत. त्यात जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण १८ हजार ९३९ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पूर्वी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांपैकी ८० टक्के पदे भरली जाणार होती. परंतु आता सुधारित आदेशानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा विचार होणार आहे. पात्र सर्व उमेदवारांना, तसेच २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना पुन्हा या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड मंडळातर्फे भरतीची प्रक्रिया होणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे, ॲानलाईन परीक्षा घेणे, निकाल देऊन पदस्थापना देण्याची कार्यवाही हे मंडळ करणार आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने बिंदूनामावलीप्रमाणे डिसेंबर २०२३ पर्यंत भरतीसाठी पात्र असणारी ९८५ पदे काढली आहेत. परंतु शासनाने मार्च २०२४ पर्यंतच्या रिक्त पदांचा विचार केल्याने १ हजारांहून अधिक पदांची भरती होण्याची शक्यता आहे.भरतीसाठी आयबीपीएस कंपनीची निवडशासनाने ही परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या कंपनीची निवड केली असून कंपनीकडून ॲप्लिकेशन पोर्टल विकसित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी लागणारा जाहिरातीचा नमुना, रिक्त पदांची आरक्षण प्रवर्ग निहाय माहिती, वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हतेबाबतची माहिती सर्व नोडल अधिकाऱ्यांनी कंपनीस तातडीने कळवावी, जेणेकरून पोर्टल विकसित करणे सुलभ जाईल, असेही शासनाने कळवले आहे.या पदांची होणार भरतीकनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका महिला, विस्तार अधिकारी कृषी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी आदी १८ संवर्गातील पदांची भरती होणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर