शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पैसे वसुलीची चौकशी करणार : सुधीर पारवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 11:53 IST

आम्ही कोणालाही पैसे गोळा करायला सांगितले नव्हते.  तशा सूचनाही दिल्या नव्हत्या. तरीही पंचायत राज समितीच्या नावाखाली कोणी पैसे वसुल केले असतील तर त्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करु, असे पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले.

अहमदनगर : आम्ही कोणालाही पैसे गोळा करायला सांगितले नव्हते.  तशा सूचनाही दिल्या नव्हत्या. तरीही पंचायत राज समितीच्या नावाखाली कोणी पैसे वसुल केले असतील तर त्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करु, असे पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले.शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पारवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली़. या बैठकीला समितीचे १८ सदस्य व जिल्हा परिषदेचे सर्व विद्यमान विभाग प्रमुख, तत्कालिन विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामांची माहिती घेऊन २०१३-१४ मधील लेखाआक्षेपांवर काय कारवाई केली किंवा का केली नाही, याची माहिती विभाग प्रमुखांकडून समितीने जाणून घेतली. त्यानंतर समितीचे अध्यक्ष आमदार पारवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.पंचायत राज समितीच्या नावाखाली मोठा योगदान निधी गोळा केल्याची चर्चा तसेच समितीसाठी अधिकाऱ्यांनी केलेली सरबराई याबाबत पत्रकारांनी पारवे यांना विचारले. त्यावर पारवे म्हणाले, समिती एकही रुपया कोणाकडून घेत नाही. पारदर्शकपणे तपासण्या करुन कारवाई करण्याबाबत साक्ष लावलेल्या आहेत.आमच्या नावावर कोणी पैसे वसुली केली असेल तर त्याबाबत चौकशी करणार असून सबंधितावर कारवाई करणार आहोत़ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय यंत्रणा टिकली पाहिजे,असे पंचायत समितीचे मत असून त्याबाबत केंद्र व राज्य सरकारला शिफारस करणार असल्याचे पारवे म्हणाले.राज्यात एक लाख आक्षेप प्रलंबितराज्यात सहा विभागीय आयुक्त आहेत़ सर्व विभागीय आयुक्तांच्या मी मुंबईत बैठका घेतल्या़ राज्यातील जिल्हा परिषदांचे लेखाआक्षेप आणि आयुक्तांनी केलेली तपासणी यात ताळमेळ नसतो़ यांचे मुद्दे वेगळे, त्यांचे मुद्दे वेगळे असतात़ १००-१०० आक्षेप असतात़ त्यावर तात्काळ कारवाई होणे गरजेचे असते़ पण आयुक्त कारवाई करीत नाहीत़ राज्यात सध्यस्थितीत एक लाख आक्षेप प्रलंबित आहेत़‘लोकमत’ वृत्तांकनाचा उल्लेखपैसे वसुलीचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर पारवे म्हणाले, आम्ही पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. अधिका-यांना कामाबाबत सूचना दिल्या आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्तांकन आले आहे़.ते वाचा, असे सांगत पारवे यांनी ‘लोकमत’च्या वृत्तांकनाचा उल्लेख केला.‘सीईओं’ची साक्ष घेणारजेथे त्रुटी आढळल्या त्याबाबतचे अहवाल मागवले आहेत. नगरमध्ये अनेक विभागांच्या कामांमध्ये त्रुटी आढळल्या असून, त्याबाबत अधिका-यांच्या साक्ष लावलेल्या आहेत. समिती येणार असल्याचे कळल्यावर साहित्याचे वाटप झाल्याचे दिसले. ही बाब योग्य नाही. त्यामुळे कारवाई झाली नसल्याने तत्कालीन व सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांची साक्ष समिती घेणार आहे. या साक्ष मुंबईत होतील, असे पारवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद