शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नगरचा मोहरम : रूबाब अन् मर्दानी थाटात सजतो नवसाचा वाघ

By अरुण वाघमोडे | Updated: September 19, 2018 13:24 IST

गळ्यात फुलांच्या माळा... डोक्यावर मोर पिसारा...दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात सजलेले नवसाचे वाघ सवाऱ्यांच्या दर्शनासाठी निघतात तेव्हा नगरच्या मोहरममध्ये धार्मिक एकतेचे दर्शन घडते.

अरूण वाघमोडेअहमदनगर : गळ्यात फुलांच्या माळा... डोक्यावर मोर पिसारा...दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात सजलेले नवसाचे वाघ सवाऱ्यांच्या दर्शनासाठी निघतात तेव्हा नगरच्या मोहरममध्ये धार्मिक एकतेचे दर्शन घडते.शहरातील कोठला, दाळमंडई आणि मंगलगेट हवेली परिसरात मंगळवारी मोहरमच्या सातव्या दिवशी नवसांच्या वाघांचाच आवाज घुमला.अगदी १ वर्षे वय असलेल्या मुलापासून ते ३० वर्षांचे तरूणही नवसाचे वाघ बनून धार्मिक परंपरेत सहभागी झाले होते.मोहरममध्ये नवसाचे वाघ सजवून नवस फेडण्याची ५०० वर्षांची परंपरा असल्याचे मुख्य मुजावर सय्यद रफा वहिदअली यांनी सांगितले. मोठे इमाम हसन आणि छोटे इमाम हुसेन यांची ताबूत सवारी नवसाला पावते अशी लोकश्रद्धा आहे.  त्यामुळे सर्वधर्मीय भाविक येथे नवस (मन्नत) बोलतात.  माझ्या मुलाला कुठलाही आजार होऊ नये, तो वाघासारखा चपळ आणि तंदुरूस्त रहावा असे मागणे मागून मुलाला वाघासारखे तयार करून वाजतगाजत सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते. मोहरमच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या असे तीन दिवस नवसाचे वाघ सवारींच्या दर्शनासाठी नेले जातात.  मुलींसाठी केलेला नवस फेडण्यासाठी त्यांच्या डोक्यावर फुले ठेवून सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते. नगर शहराचा लौकिक वाढविणारा मोहरम देशभरात प्रसिद्ध आहे.सवारी मिरवणूककोठला येथे छोटे इमाम हुसेन, मंगलगेट हवेली येथे मोठे इमाम हसन यांच्या सवारीची स्थापना होते तर सावेडी येथे अली अब्बास यांच्या सवारीची स्थापना होते. शहरात विविध ठिकाणीही सवारींची स्थापना केली जाते. २० सप्टेंबर रोजी कत्तलच्या रात्री सवा-यांची मिरवणूक निघणार आहे. २१ सप्टेंबर रोजी ताबूत सवारी मिरवणूक निघून विसर्जन होणार आहे.दर्शनासाठी देशभरातील भाविकांची उपस्थितीमोठे इमाम हसन व छोटे इमाम हुसेन यांच्या सवारींच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. ट्रस्टतर्फे मोहरम यात्रा व सुविधांची व्यवस्था पाहिली जाते. ट्रस्ट पदाधिकारी यात्रा व सुविधाची व्यवस्था पाहतात.अनेकांना रोजगारमोहरमनिमित्त नवसाचे वाघ सजविणारे रंगारी, वादक, कापड विक्रेते, फुले व प्रसाद विकणाºया व्यावसायिकांसह छोट्या मोठ्या वस्तू विकणा-यांनाही दहा दिवस चांगला रोजगार उपलब्ध होतो. नवसाचे वाघ रंगविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करत असून, चांगला रोजगार मिळतो असे बाळू आपटे व शंकर गायकवाड या कलाकारांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर