शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे दु:ख पहायला मोदींना वेळ नाही का?

By admin | Updated: June 26, 2016 00:35 IST

आश्वी : सरकार नावाची कोणतीही व्यवस्था दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. व्यापारधार्जिण्या शेतकऱ्यांना

आश्वी : सरकार नावाची कोणतीही व्यवस्था दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. व्यापारधार्जिण्या शेतकऱ्यांना ग्रामीण भागाचे प्रश्न समजलेले नाहीत. मत मागण्यासाठी आलेले पंतप्रधान राज्यातील शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला फिरकलेही नाहीत. आता स्मार्ट सिटीच्या उद्घाटनाला येत आहात तर, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही भेटून जा, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी भाजप सरकारला मारला आहे. निमगावजाळी आणि प्रतापपूर (ता. संगमनेर) येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात विखे बोलत होते. सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवताना ते म्हणाले, राज्यातील जनता दुष्काळाने होरपळली आहे. पण आवश्यक उपाययोजना करायला सरकारकडून चालढकल होत आहे. उलट चुकीची परिपत्रके काढून शेतकऱ्यांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवण्याचे काम होत आहे. राज्यात पावसाअभावी मोठे चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांकडील उत्पन्नाची सर्व साधने संपली आहेत. समन्यायी पाणी वाटप कायद्याचा चुकीचा अर्थ काढून भंडारदरा, निळवंडे धरणांसह गोदावरी खोऱ्यातील धरणांतून पाणी सोडण्यात आले. याचा मोठा परिणाम दोन्हीही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना भोगावा लागलो. शेतीक्षेत्र उद्ध्वस्त झाले असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याचे मोठे आव्हान समोर उभे राहणार आहे. मागील सरकारने शेतकऱ्यांना पॉलिहाऊस, शेडनेटसाठी अनुदान दिले होते. मात्र या सरकारने हे अनुदान विनाकारण रखडविले आहे. राज्याला महसूल मंत्री, कृषी मंत्री नसल्याने सरकारचे सर्व कामकाज ठप्प झाले असल्याकडे विखे यांनी लक्ष वेधले.(वार्ताहर)सरकारला भ्रष्टाचाराची कीड लागली असून सरकार नावाची व्यवस्थाच अस्तित्वात राहिलेली नाही. वाळूमाफियांना मंत्र्यांचे संरक्षण मिळत असून अधिकाऱ्यांच्या बदलीचे भाव वाढत चालले आहेत, अशी टीका विखे यांनी पाथरे बुद्रूक येथे केली. जोर्वेतील वाळू माफियांना माजी मंत्र्यांचे संरक्षण मिळत आहे. मागील काळापासूनच महसूलच्या अधिकाऱ्यांचे भाव वाढत चालले आहेत. आता तर सरकारने बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे सांगत विखे यांनी सरकारवर निशाणा साधला.