शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

श्रीरामपूरमध्ये मोबाईल चोरांची टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 18:36 IST

चोरीच्या मोबाईलचा आय. एम. ई. आय. क्रमांक बदलून मोबाईल विक्री करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पकडले. त्यांच्याकडून दोन दरोड्यातील मोबाईल जप्त केले.

श्रीरामपूर : चोरीच्या मोबाईलचा आय. एम. ई. आय. क्रमांक बदलून मोबाईल विक्री करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पकडले. त्यांच्याकडून दोन दरोड्यातील मोबाईल जप्त केले.जिल्ह्यातील चोºया व दरोड्याचे प्रकार वाढत असताना त्यामध्ये चोरीस गेलेले मोबाईल आय.एम. ई. आय. क्रमांकाद्वारे शोधूनही सापडत नव्हते. जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी याबाबत अधिक तपास केला असता श्रीरामपूर येथे मोबाईल हँडसेटचे आय.एम. ई.आय. क्रमांक बदलून ते विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती मिळाली.या माहितीवरुन गुन्हे शाखेचे फौजदार सुधीर पाटील, हवालदार मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, दीपक शिंदे, संदीप पवार, संभाजी कोतकर व रवी सोनटे यांनी श्रीरामपूर शहरातील बिफ मार्केट परिसरात शुक्रवारी छापे टाकून मुजफ्फर इसाक कुरेशी यास अटक केली. त्याने लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापारी तेजस गुजर याला लुटले होते. या गुन्ह्यात स्वाईप मशीन, मोबाईल व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये जब्बार शेख यांच्याकडे घरफोडी केल्याची कबुली दिली.दोन्ही गुन्ह्यातील चोरलेले मोबाईल आय. एम. ई. आय. क्रमांक बदलून ते विकण्यासाठी तांबोळी संकुलातील विनर मोबाईल शॉपीचे चालक समीर शेख यांच्याकडे दिल्याचे मुजफ्फर कुरेशी याने पोलिसांना सांगितले. तपासादरम्यान गुन्ह्यातील इतर साथीदार जाफर उर्फ कटर शेख व किरण गारुडी उर्फ सोनवणे यांच्याबद्दल माहिती दिली.गुन्हे शाखेच्या पथकाने समीर शेख यांच्या मोबाईल शॉपीवर व घरावर छापा टाकून लॅपटॉप, २ मोबाईल व एक संगणक जप्त केला. पथकाने पकडलेल्या दोन्ही आरोपींचा लोणी येथील एका गुन्ह्यातील सहभाग उघड झाला आहे. त्यामुळे त्यांना लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपींकडून मोबाईल चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर