उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी २५ एप्रिल रोजी पारनेर पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी दुय्यम कारागृहाची नियमित तपासणी करण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे व पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बळप यांना अवगत करण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारागृहाची अचानक तपासणी केली. यावेळी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश नीलेश कर्डिले यांच्याकडे दोन मोबाईल मिळून आले. हे मोबाईल तुम्हाला कोणी दिले, अशी विचारणा अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे केली तेव्हा हे मोबाईल भत्ता देणारे सुभाष लोंढे व प्रवीण देशमुख (रा. दोघे सुपा) यांनी दिल्याचे या आरोपींनी सांगितले. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी उपनिरीक्षक बालाजी पदमने हे पुढील तपास करत आहेत.
कारागृहातील आरोपींकडे सापडले मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST