अकोला: शिष्यवृतीचा निधी खर्च झाला नसल्याने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील निरीक्षक आर.ए. शिरभाते यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. देवेंदर सिंह यांनी मंगळवारी दिला. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत इयत्ता दहावीपर्यंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे वाटप करण्यात येते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी शासनामार्फत समाजकल्याण विभागाला प्राप्त झालेला निधी अखर्चित राहिला. शिष्यवृत्तीचा निधी खर्च झाला नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले. या पृष्ठभूमीवर शिष्यवृत्ती निधी वाटपाच्या कामात हलगर्जी केल्याने समाजकल्याण निरीक्षक आर.ए.शिरभाते यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला.
मनुष्यबळाअभावी ‘व्हिसी’ यंत्रणा मुकी
By admin | Updated: June 24, 2016 01:20 IST