शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव तालुक्यात अल्पवयीन मुलगी, युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:52 IST

तालुक्यातील हिंगणगाव-ने परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत अल्पवयीन मुलगी व एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

शेवगाव : तालुक्यातील हिंगणगाव-ने परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत अल्पवयीन मुलगी व एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि.१३) ग्रामस्थ व पोलिसांनी क्रेनच्या सहायाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. याबाबत मयतांच्या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर आरोप केल्याने घटनेचा तपास करून त्याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.प्रतिभा नामदेव बामदळे (वय १६), राजेंद्र परमेश्वर शिंदे (वय २७, दोघेही रा. हिंगणगाव-ने, ता. शेवगाव) अशी मयतांची नावे आहेत. हिंगणगाव-ने येथील प्रतिभा नामदेव बामदळे (वय १६) ही अल्पवयीन मुलगी गुरुवारी (दि.९ मे) शौचालयास जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. ती पुन्हा घरी आलीच नाही. तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. यावेळी शेजारीच राहणारा गावातील राजेंद्र परमेश्वर शिंदे (वय २७) हा सुद्धा घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुलीची आई लक्ष्मी नामदेव बामदळे यांनी गुरुवारी रात्री शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र शिंदे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.दरम्यान, सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास हिंगणगावच्या पूर्वेस असलेल्या संपत किसन मिसाळ यांच्या विहिरीतून कुजलेल्या अवस्थेतील दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी मोठी गर्दी झाली होती. हे प्रेमीयुगूल असल्याची परिसरात चर्चा होती. दरम्यान, या घटनेबाबत बामदळे व शिंदे या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर, सहायक फौजदार भाऊसाहेब गिरी, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर माळवे, पोलीस शिपाई योगेश गणगे, वैजिनाथ चव्हाण आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस पथकाला तपासाबाबत पुढील सूचना दिल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव