अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी संदीप बाबाजी पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर) याला सुटीतील न्यायालयाचे न्यायाधीश ए.एन. चौरे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पठारे याने दीड महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्यात नेऊन अत्याचार केला होता. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. ४ आॅक्टोबरला आरोपीने पुन्हा त्याच मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि सोमवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सुरेश लगड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By admin | Updated: October 6, 2014 23:56 IST