शिर्डी : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेवून अत्याचार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी शुक्रवारी एका तरुणाला अटक केली़ या प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर तरुण एकत्र झाले होते़या संदर्भात पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, आरीफ अकबर शेख (वय ३५, रा़ श्रीरामपूर) हा शिर्डीतील इनामवाडी परिसरात सासुरवाडीला राहात होता़ बांधकाम करणाऱ्या या आरीफने याच भागात राहणाऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले व लग्नाचे आमिष दाखवून ९ सप्टेंबर रोजी पळवून नेले होते़ आरीफने या मुलीवर या काळात अत्याचार केला़ यानंतर दोघे औरंगाबाद, दौलताबाद येथे फिरुन गुरुवारी श्रीरामपूरमध्ये आले असता पोलिसांनी त्यांना संशयावरुन ताब्यात घेतले़ दरम्यान संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार शिर्डी पोलिसात दाखल असल्याने या दोघांनाही शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन या आरोपीवर बलात्कार, पळवून नेणे, फसविणे, लैंगिक शोषण कायदा कलम ३ अ व ४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी तरुणांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती़
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By admin | Updated: May 31, 2024 10:11 IST