शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मंत्री थोरात यांचे जोर्वे गावी जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:47 IST

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदा आपल्या जोर्वे गावी येताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांत  मिरवणूक काढली.

संगमनेर : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदा आपल्या जोर्वे गावी येताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांत  मिरवणूक काढली.जोर्वे ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी प्रेरणादिनानिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कांचनताई थोरात, रणजितसिंह देशमुख, सभापती सुनंदा जोर्वेकर, सुरेश थोरात, आर. एम. कातोरे, सरपंच रवींद्र खैरे, डॉ.सी.के.मोरे, शांताबाई खैरे, अ‍ॅड.लक्ष्मण खेमनर, के. के. थोरात, गबाजी खेमनर, संदीप नागरे उपस्थित होते.नामदार बाळासाहेब थोरात यांचे जोर्वे गावामध्ये आगमन होताच ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने त्यांची मिरवणूक निघाली. रस्त्यांच्या दुतर्फा सुवासनी त्यांना ओवाळण्यासाठी थांबल्या होत्या. अनेक लहान मुले, विद्यार्थी आनंदाने नाचत होते. अनेकांच्या दारासमोर रांगोळ्या काढलेल्या होत्या तर घरासमोर गुढ्या उभारल्या होत्या. संपूर्ण गावांमध्ये अतिशय प्रसन्न व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. हा भव्यदिव्य स्वागत समारंभ पाहून सर्वजण भारावून गेले. या कुस्ती स्पर्धांमध्ये २५० पहिलवानांनी सहभाग घेतला होता. यात युवराज चव्हाण हा कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला. प्रास्ताविक इंद्रजित  थोरात यांनी केले. सूत्रसंचालन रामदास काकड यांनी केले तर सुरेश थोरात यांनी आभार मानले. जोर्वे गावची संस्कृती व संत सावलीतील संस्कार आपण कायम जपले असून प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी राहिलो आहे. वेगवेगळ्या पदावर काम करताना संगमनेर तालुक्यातील जनतेने केलेले भरभरून प्रेम हे कायम हृदयात आहे. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये आनंद व समृद्धी निर्माण व्हावी यासाठीच आपण काम करत आहोत, असेही मंत्री थोरात यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातministerमंत्रीSangamnerसंगमनेर