शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बांधावरच्या शेवग्यातून लाखाची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:07 IST

वेगळे काही तरी करावं म्हणून दोन वर्षापूर्वी केलेल्या शेवगा पिकाने राहाता तालुक्यातील कोल्हार येथील राऊत परिवारातील शेतकऱ्याने २० गुंठे लागवडीतून वर्षाला लाखाची कमाई केली आहे.

यमन पुलाटेराहाता : वेगळे काही तरी करावं म्हणून दोन वर्षापूर्वी केलेल्या शेवगा पिकाने राहाता तालुक्यातील कोल्हार येथील राऊत परिवारातील शेतकऱ्याने २० गुंठे लागवडीतून वर्षाला लाखाची कमाई केली आहे.कृषी पदवीधर असलेल्या संजय बबनराव राऊत यांनी आपल्या शेताच्या बांधावर शेवगा लावला. कृषी विज्ञान केंद्राकडून पी.के. एम.-१ ची पाच रोपे आणली. ती बांधावर चांगली बहरली. घरचे भागून स्थानिक कोल्हारच्या आठवडे बाजारात विक्री करताना शेवग्याला कायमचं २० ते २५ रुपयांचा दर मिळाला. मग हाच बागायत शेवगा शेतात लागवड करण्याचा निर्णय घेतला, मनात प्रश्न होता आपली काळी जमीन बागायत क्षेत्र शेवगा लागवड शक्य होईल का? म्हणून बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, शांताराम सोनवणे, सुनील बोरुडे आणि भरत दंवणे यांच्या सोबत चर्चा केली. शेवगा लागवडीचा निर्णय घेऊन पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मोठी बेड तयार केली. जून २०१६ ला केंद्राकडून ३०० रोपे घेतली. त्यांची लागवड १२७६ अंतरावर केली. सुरुवातीला शेण खतांचा वापर केला. सहा महिन्यात शेवगा चांगला बहरला. सुरुवातीला एका झाडापासून सरासरी २५ ते ३० किलो शेंगा मिळत. शेवगा पूर्णता सेंद्रीय करायचा ही जिद्द ठेऊन शेवगा पिकास गांडूळ खत, व्हर्मीवॉश आणि जिवाणू स्लरीचा वापर सुरु केला. रस शोषणाºया किडींसाठी करंज तेल आणि निंबोळी तेलाचा वापर करीत या झाडापासून सध्या प्रत्येकी ५० ते ६० किलो शेंगा मिळत असून वर्षातून सरासरी खर्च वजा जाता. लाखांचे उत्पादन सध्या मिळत आहे.शेवगा हा गुणकारी आहे. शेवग्यांच्या पाने, फुले आणि शेंगा असे तिहेरी उत्पादन मिळते. आयुर्वेदात शेवग्याला महत्व असल्याने बाजारात वर्षभर मागणी असते. लोणी, कोल्हार, राहाता, श्रीरामपूर या स्थानिक बाजारात विक्री करीत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.शेवगा हे पीक जिरायत भागाबरोबरच बागायत भागासाठी वरदान आहे. छाटणी तंत्र, गांडूळ खतांचा वापर तर ठिबकव्दारे स्लरी आणि व्हर्मीवॉशचा वापर केला तर उत्पादन चांगले मिळते. शेतकºयांनी वेगळं काही तरी केले तर नक्कीच फायदा हा होत असतो. शेती हा व्यवसाय नाहीतर तो उद्योग आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग असला तर प्रगती होत असते. शेतीमध्ये वेगळेपणा जपला तर आपली भूमाता आपल्याला यश हमखास देत असते. यासाठी वडील बबनराव, आई रुख्मिणीबाई, पत्नी स्वाती, भाऊ विजय, भावजयी सीमा यांची मदत होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता