शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

सशस्त्र दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By admin | Updated: April 1, 2017 21:00 IST

चाकूहल्ला करून पिस्तुलाचा धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटणारी ६ अट्टल दरोडेखोरांची टोळी शनिवारी कोपरगाव तालुका पोलिसांनी पकडली.

आॅनलाइन लोकमतकोपरगाव (अहमदनगर), दि़ १ - कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील व्यापारी परिमल चंद्रशेखर भुसारे यांच्यावर चाकूहल्ला करून पिस्तुलाचा धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटणारी ६ अट्टल दरोडेखोरांची टोळी शनिवारी कोपरगाव तालुका पोलिसांनी पकडली. या टोळीकडून गावठी कट्यासह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मार्चला रात्री सव्वा नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या ५-६ दरोडेखोरांनी भुसारे यांच्यावर चाकूने हल्ला करून बंदुकीचा धाक दाखवत रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील व तालुका पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पी.वाय कादरी यांनी गुन्ह्याचा तपास केला. हेड कॉन्स्टेबल प्रदीप काशिद, इरफान शेख, असीर सय्यद, अशोक गाढे, अशोक कुदळे, दिगंबर कोळी, किशोर कुळधर यांच्या सहकार्याने ठिकठिकाणी सापळे लावून पोलिसांनी सुनील शांताराम घाडगे (वय २६, रा. अंदरसुल ता. येवला जि. नाशिक), संदीप शांताराम गायकवाड (वय २३, रा.गवंडगाव ता.येवला जि.नाशिक), रविंद्र उर्फ भावड्या त्र्यंबक गोरे ( वय २५ रा.कोंबडवाडी ता.येवला), रणजीत रामभाऊ सोनवणे (वय १९, रा.टाकळी, ता.कोपरगाव ), अनिल रघुनाथ कचरे(वय १९, रा.लक्ष्मीनगर, सावळी विहीर, ता.राहाता), सुरेश उर्फ राजू उत्तम भालेराव (वय ३५, रा. मेंढेगाव ता.चिखली, जि. बुलढाणा ) यांच्या मुसक्या आवळल्या.वीरगावच्या पंपावरील दरोड्याची कबुलीपोलिसी खाक्या दाखविताच दरोडेखोरांनी वीरगाव (ता.वैजापूर) पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. या टोळीने नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हत्याराचा धाक दाखवून अनेकांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १ गावठी कट्टा, १ चाकू, २ दुचाकी, ८ मोबाईल, २१ हजारांची रोकड असा एकूण १ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या दरोडेखोरांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.