शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात म्हाडाने पोलिसांना दिली ‘लिफ्ट’; ८० सदनिकांचा मिळाला ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 17:06 IST

श्रीरामपूर शहरात सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. या सदनिकांमधील ८० सदनिकांचे वितरण नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पोलिसांना करण्यात आले. 

ठळक मुद्दे८० सदनिकांचे वितरण नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पोलिसांना करण्यात आले. श्रीरामपूर शहरात सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. 

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. या सदनिकांमधील ८० सदनिकांचे वितरण नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पोलिसांना करण्यात आले. श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस ठाण्यात १४० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित पोलिसांनाही म्हाडाच्या प्रकल्पात घरे मिळावीत, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.शहरातील म्हाडामधील सदनिका सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध क रून द्याव्यात, यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे पाठपुरावा केल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. सरकारी योजनांचा लाभ शहरवासीयांना मिळावी यासाठी आग्रही आहोत असे ते म्हणाले.शहरातील म्हाडा प्रकल्पातील सदनिकांचे पोलीस कर्मचा-यांना हस्तातंरित करण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार लोखंडे बोलत होते. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक अरुण जगताप, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, मुख्याधिकारी सुमंत मोरे, तहसीलदार सुभाष दळवी, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.शहर व तालुका पोलीस ठाण्यात १४० पोलीस कर्मचारी काम करतात. उर्वरित पोलिसांसाठीदेखील लवकरात लवकर सदनिका मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करणार आहोत. सरकारी योजनांचा लाभ त्यांना दिला जावा. मात्र, प्रकल्प व लाभार्थी दोघेही सरकारी सेवेशी असल्याने सदनिकांचे दर कमी असावेत अशी मागणी मंत्री मेहता यांना प्रत्यक्ष भेटून केल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले. नगरपालिका तसेच महावितरण येथे पायाभूत सुविधा पुरवणार आहे. त्यामुळे पोलिसांचा कामांतील उत्साह आणखी वाढीस लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नगराध्यक्षा आदिक यांनी म्हाडामुळे शहराच्या वैभवात भर पडल्याने समाधानी असल्याचे गौरवोद्गार काढले. प्रशस्त असा हा प्रकल्प असून पालिका नागरी सुविधा देण्यास क टिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, संतोष काबळे, मुक्तार शाह, प्रकाश ढोकणे, अभियंता जी.जी.सोनार आदी उपस्थित होते.

अद्ययावत सुविधा

पोलीस अधीक्षकांच्या नावे प्रकल्पातील ८० सदनिका खरेदी करण्यात आल्या आहेत. पोलीस कर्मचारी वसाहत म्हणून त्यांचा वापर केला जाणार आहे. यातील ७८ सदनिका या मध्यम उत्पन्न गटासाठी (७०० चौरस फूट) व अन्य दोन कमी उत्पन्न गटासाठी (५०० चौरस फूट) आहेत. पोलिसांसाठी स्वतंत्र इमारतीत ही निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. फ्री फॅब तंत्रज्ञान या प्रकल्पात राबविण्यात आले आहे. मलशुद्धीकरण, बगीचा, पेव्हिंग ब्लॉक व इतर सुविधा येथे प्रदान करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरAnuradha Adikअनुराधा आदिकSadashiv Lokhandeसदाशिव लोखंडेmhadaम्हाडा