शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संवत्सरी पर्वातून मैत्री आणि शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:20 IST

प्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.

सन्मतीवाणीप्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.पर्युषण पर्वात जास्तीत जास्त धर्म आराधना करण्याची सुवर्णसंधी असते. त्या संधीचा फायदा घेऊन धर्म आराधना करुन प्रत्येकाने मन निर्मळ करावे. आत्मशुध्दी, शरीर शुध्दी करण्याची संधी या पर्वात असते. अंतगढ सूत्रात आठ वर्ग असून ९० अध्याय आहेत. या सूत्रात जीवनशैली कशी असावी याचे मार्गदर्शन मिळते. धर्मस्थानावर आपण कशासाठी येतो याचा विचार करा. तुमच्या जवळ सर्वकाही आहे, पण तुम्हाला त्याचा विसर पडला. तुमच्या अंतर्मनावर विषयांची धूळ साचली आहे. ती धूळ साफ करुन मन निर्मळ करा. स्वत:ची नजर बदलली तर सर्व जगच चांगले दिसेल. पर्युषण पर्व ही संधी आहे. संवत्सरी पर्व शांतता व मैत्रीचा संदेश देते. मनुष्य चुका करतो, पण त्या कबुल करण्यातच प्रत्येकाचे हित आहे. आपल्या चुका दुसºयावर ढकलू नका. आपल्या चुकांबद्दल क्षमायाचना केली तर मन साफ होईल. मैत्री व प्रेमाचे वातावरण तयार होईल. नाते संबंधातील दरी दूर करा. वेगळाच आनंद मिळू शकतो. आत्मपरीक्षण करीत रहा. म्हणजे तुम्हाला चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल.आपली चूक एक पुस्तकाचे पान आहे. तर नातेसंंबंध हे पुस्तक आहे. केवळ चुकीमुळे आपण पाने फाडू शकतो पण नाती टिकविण्यासाठी पुस्तक फाडू शकत नाही. आधी तुम्ही स्वत: बदला. दुसरे आपोआप बदलतील याची खात्री ठेवा. आपण जी चूक करतो, त्यामुळे आयुष्य खराब होते. आपले जीवन आंब्याप्रमाणे मधूर, गोड बनवा. लिंबाप्रमाणे कडवटपणा नको. जीवनात कडूपणाचा दुर्गंध पसरु देऊ नका. माणसामाणसात मैत्रीचे संबंध निर्माण झाले तर जगातून द्वेषाचे वातावरण कमी होईल. मानव जातीला आनंदाचे, सुखाचे दिवस येतील.-पू.श्री.सन्मती महाराज

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर