लोकमत न्यूज नेटवर्कराहाता/पुणतांबा (अहमदनगर) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान क्रांती संघटनेच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू आहे. त्यात राज्यातील शेतकरी स्वयंस्फूर्तीने जागृती करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एक जूनला होणाऱ्या शेतकरी संपास पाठिंबा म्हणून पुणतांबा येथील व्यापाऱ्यांनी रविवारी कडकडीत बंद पाळला होता. २५ जूनपासून किसान क्रांती संघटनेच्या वतीने पुणतांबा येथे जनजागृतीकरिता धरणे आंदोलन सुरु केले असून, त्याला सर्वस्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आंदोलनातील कार्यकर्त्यांनी मदतफेरी काढून मदतीचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी रविवारी पुणतांबा बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. श्रीरामपूरचे आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक आदींनी आंदोलकांशी चर्चा केली.
शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांचा बंद
By admin | Updated: May 29, 2017 04:27 IST