शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

नगरला मोहरमनिमित्त निघणार सवा-यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 18:50 IST

नगर शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमची उद्या (दि. ९) कत्तलची रात्र आहे. सोमवारी रात्री बारा वाजता सवा-यांची मिरवणूक निघणार आहे़ 

अहमदनगर: नगर शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमची उद्या (दि. ९) कत्तलची रात्र आहे. सोमवारी रात्री बारा वाजता सवा-यांची मिरवणूक निघणार आहे़ कोठला येथून छोटे इमामे हुसेन यांची तर मंगलगेट हवेली येथून मोठे इमामे हसन यांच्या सवा-यांची मिरवणूक निघेल. कत्तलची रात्रची मिरवणूक मार्ग कोठला मैदान येथून ते फलटण चौकी, बाराइमाम हवेली, मंगलगेट, डाळ मंडई, तेलीखुंट, कापड बाजार, भिंगारवाला चौक, लक्ष्मीबाई कारंजा, सबजेल चौक, पंचपीर चावडी ते रामचंद्र खुंट, कोंड्यामामा चौक ते फलटण चौकी असा आहे़ रात्रभर मिरवणूक झाल्यानंतर सकाळी पुन्हा सवा-यांची स्थापना होते़ त्यानंतर दुपारी विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे़  नगरचा मोहरम राज्यात प्रसिद्ध असून, याला मोठी परंपरा आहे़ मुस्लिमांसह हिंदू बांधवही यात सहभागी होतात़ मोहरमची कत्तलची रात्र व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़ मिरवणूक मार्गावर २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे राहणार आहेत़ मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी मार्गावरील ३६ इमारतींचे छत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊ नये, यासाठी कोठला, मंगलगेट परिसरात भरणारा मंगळवारचा बाजार महापालिका प्रशासनाने बंद ठेवला आहे़ 

टॅग्स :Muslimमुस्लीमAhmednagarअहमदनगर