शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वादातूनच शिवसैनिकांचे हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:04 IST

केडगाव येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड राजकीय वादातूनच झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचा विजयी उमेदवार विशाल कोतकर याच्या चार कार्यकर्त्यांनी संगनमताने संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून व गुप्तीने वार करून हत्या केली.

अहमदनगर : केडगाव येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड राजकीय वादातूनच झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचा विजयी उमेदवार विशाल कोतकर याच्या चार कार्यकर्त्यांनी संगनमताने संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून व गुप्तीने वार करून हत्या केली. हत्या करणारा गुंजाळ पोलिसांच्या ताब्यात असून, फरार तिघांचा शोध सुरू आहे.संदीप रायचंद गुंजाळ, संदीप बाळासाहेब गि-हे, महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे यांच्यासह आणखी एक अशा चौघांची नावे आतापर्यंत आरोपी म्हणून समोर आली आहेत. महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँगे्रसचा उमेदवार विशाल कोतकर हा निवडून आला़ निकालानंतर दुपारी सेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे सोबत होते. या वेळी संजय कोतकर व काँग्रेस कार्यकर्ता रवी खोल्लम यांच्यात फोनवर वादावादी झाली होती. फोन झाल्यानंतर संजय कोतकर व ठुबे हे खोल्लम याच्या घरी येण्यासाठी निघाले़ खोल्लम याने ही माहिती निवडणुकीतील विजयी उमेदवार विशाल कोतकर याला दिली होती. विशालच्या सांगण्यावरून संदीप गुंजाळ, मोकळे, गिºहे व आणखी एक जण खोल्लमच्या घराजवळ आले होते. संजय घटनास्थळी येताच गुंजाळ व त्याच्यात वाद होऊन गुंजाळने गोळ्या झाडल्या.>कर्डिले-जगतापांच्या कोठडीत वाढजिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची (१३ एप्रिलपर्यंत) वाढ करण्यात आली आहे़ तसेच या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या इतर १७ जणांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे़ केडगाव येथे दोघा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा कोठडीतील मुक्काम वाढला असून, त्यांच्यासह पाच जणांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे़>नेत्याच्या घरी हत्याकांडापूर्वी बैठकमयत संजय कोतकर व रवी खोल्लम यांच्यात वादावादी झाल्यानंतर केडगावात एका नेत्याच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीला काही महत्त्वपूर्ण व्यक्ती उपस्थित होत्या. त्यासंदर्भात पोलीस माहिती काढत आहेत.अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेप भोगत असलेला काँग्रेस नेता भानुदास कोतकर सध्या पॅरोलवर बाहेर आहे.त्याच्याशी या काळात केडगावातून संपर्क झाला होता का? यादृष्टीने तपास सुरू आहे. आमदार संग्राम जगताप व शिवाजी कर्डिले यांच्या सहभागाविषयी अद्यापपर्यंत माहिती समोर आलेली नाही.