शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरमध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 18:34 IST

‘सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी... गं पोरी नवरी आली. गोऱ्या गो-या गालावरती चढली पाचूची लाली. गं पोरी नव...री आली. सजली नटली नवरी आली....’ असं म्हणत नवरदेव-नवरी विवाहबद्ध होणार, तोच फिल्मी स्टाईलने एंट्री झालेल्या पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगता हा विवाह सोहळा रोखला. अन् नव-या मुलाकडील वºहाडास नवरीविना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.

ठळक मुद्देनवरीविना व-हाड रिकाम्या हाताने परतले

पारनेर : ‘सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी... गं पोरी नवरी आली. गोऱ्या गो-या गालावरती चढली पाचूची लाली. गं पोरी नव...री आली. सजली नटली नवरी आली....’ असं म्हणत नवरदेव-नवरी विवाहबद्ध होणार, तोच फिल्मी स्टाईलने एंट्री झालेल्या पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगता हा विवाह सोहळा रोखला. अन् नव-या मुलाकडील वºहाडास नवरीविना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील मंगल कार्यालयात शुक्रवार ४ मे रोजी हे नाट्य काही काळ चांगलेच रंगले. पारनेर तालुक्यातील एक गावातील मुलीचे लग्न जमले, साखरपुडा झाला, नवरा नवरीला हळद लागली, चुडा भरला आणि लग्नाचा दिवसही उजाडला. पै पाहुण्यांची लगबग सुरू झाली. नवरदेव घोड्यावर बसला. सनईच्या मंगल सुरात व-हाडी मंडळी वाजतगाजत मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचली. नवरदेव नवरी बोहोल्यावर चढण्याच्या अगोदर काही मिनिटातच याठिकाणी विवाह लावला जात असलेली मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती पारनेर पोलिसांना अहमदनगरच्या चाईल्डलाइन संस्थेकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा हा विवाह रोखला. त्यामुळे वराकडील व-हाडी मंडळींना मोकळ्या हाताने माघारी फिरण्याची वेळ आली.टाकळी ढोकेश्वरच्या मंगल कार्यालयात शुक्रवार ४ मे रोजी दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचा विवाह तालुक्यातीलच दुसºया गावातील मुलाशी आयोजित करण्यात आला होता. मात्र गावातील एका जागरूक नागरिकाने वधू मुलीचे वय कमी असल्याची तक्रार अहमदनगरच्या चाईल्डलाइन संस्थेकडे केली होती. त्यांनी पारनेर पोलिसांना याबाबत दिल्यानंतर पारनेर पोलिसांनी लग्न घटिकेच्या काही वेळ अगोदर या मुला मुलीकडील मंडळींना या अल्पवयीन मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्यात येईल, असा लेखी जबाब नोंदवून घेतला. पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शना खाली हेडकाँस्टेबल संतोष शेळके, शरद पवार, निवृत्ती साळवे आदींनी अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर