श्रीगोंदा : वडगाव शिंदोडी येथील लता संदीप पवार ( वय ३५) या विवाहितेचा पेटवून देऊन खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.बेलवंडी पोलिसांनी याबाबत मयत लता पवार हिचा पती संदीप हनुमंत पवार, बबन सर्जेराव पवार, पांडुरंग बबन पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पैकी संदीप पवारला अटक करण्यात आली आहे. या घटनेत संदीप जखमी आहे. त्याच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किरकोळ कारणावरुन पती संदीप याने पत्नी लता हिला पेटवून दिले व वरील दोघांनी त्याला फूस दिली, असा आरोप आहे. बबन पवार याने आठवड्यापूर्वी छेड काढली होती, असा जबाब लता हिने दिला आहे.
विवाहितेचा पेटवून देऊन खून
By admin | Updated: August 20, 2016 01:03 IST