शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक : संगमनेरात बस जाळली, अहमदनगर- औरंगाबाद महामार्ग ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 11:42 IST

मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातही मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बस जाळण्यात आली आहे.

अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातही मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बस जाळण्यात आली आहे.काल मध्यरात्रीच्या बारा वाजण्याच्या सुमारास घटना घडली. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान टोल नाक्याजवळ ही बस जाळण्यात आली. नाशिकहून पंढरपूर कडे जाणारी बस प्रवाशांना खाली उतरवून पेटवण्यात आली.याबाबत अज्ञात ६ ते ७ जणांविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काल रात्री गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर, राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शेवगाव बंद यशस्वी करण्यात आला. नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राहुरी शहरातही १०० टक्के बंद यशस्वी करण्यात येत आहे. नेवासा, श्रीगोंदा, जामखेड, कोपरगाव, संगमनेर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी संप पुकारण्यात आला आहे. ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.अहमदनगर - औरंगाबाद महामार्ग ठप्पच..सोमवारी दुपारी चारनंतर काकासाहेब शिंदेच्या मृत्यूचे वृत्त पसरल्यानंतर वातावरण चिघळून अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील पुलावर रास्ता रोको सुरू करण्यात आला. ही वाहतूक अद्यापही सुरळित झाली नाही. त्यामुळे महामंडळाने पुणे-औरंगाबाद मार्गावरील बस बंद ठेवण्यात आल्या आहे. काल रात्रीदेखील या महामार्गावरील औरंगाबादकडे जाणारी वाहतूक बंद होती. या मार्गावरील वाहतूक शनिशिंगणापूर फाटा, कुकाणा, शेवगाव, पैठणमार्गे औरंगाबादकडे वळविण्यात आली आहे. प्रवरासंगम पुलावर सुमारे चारशे-पाचशे तरूणांचा जमाव ठिय्या देऊन होता. या रास्ता रोकोमुळे नगर- औरंगाबाद महामार्गावर दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा