शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

मराठा उद्योजक नगरचे कारखाने बंद ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:14 IST

अहमदनगर : मराठा क्रांती महा मूकमोर्चासाठी येत्या शुक्रवारी कारखाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी उद्योजकांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला़

अहमदनगर : मराठा क्रांती महा मूकमोर्चासाठी येत्या शुक्रवारी कारखाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी उद्योजकांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला़ तसेच मराठा समाजातील तरुणांना मदत करण्यासाठी दर महिन्याला बैठक घेण्याचेही यावेळी ठरले़नागापूर औद्योगिक वसाहतीतील मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या सभागृहात मराठा उद्योजकांची बैठक पार पडली़ बैठकीस औद्योगिक वसाहतील शेकडो उद्योजक उपस्थित होते़ बैठकीच्या सुरुवातीला येत्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती महा मूकमोर्चाची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली़ उद्योजक व कारखान्यांतील अधिकारी व कामगारांना मोर्चात सहभागी होता यावे, यासाठी शुक्रवारी दिवसभर कारखाने बंद करण्याचा निर्णय उद्योजकांच्या वतीने जाहीर करण्यात आला़ उद्योजकांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून, मोर्चात कामगारांना सहभागी होता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़मराठा उद्योजक आपले कारखाने बंद ठेवून मोर्चात सहभागी होणार आहेत़ एमआयडीसीत मोर्चाच्या प्रचार व प्रसारासाठी नागापूर परिसरात फ्लेक्स लावणे, रस्त्यांवरील स्वच्छता करणे, मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची तयारीही उद्योजकांनी दर्शविली आहे़ मोर्चासाठी मराठा उद्योजक एकत्र आले असून, त्यांनी भविष्यकाळात समाजासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचाही निर्णय घेतला़ मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे़ त्यासाठी उद्योग मार्गदर्शन मेळावे घेवून तरुणांना उद्योजक होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे़ नगरसह राज्यातील मराठा उद्योजकांनी एकत्र येऊन समाजासाठी निधीही उभा करण्याचे यावेळी ठरले़ उद्योजकांसह कामगारांनी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार यावेळी उद्योजकांनी केला़मराठा मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणारमराठा समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही़ त्यामुळे तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करून परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे़ स्पर्धा परीक्षेसाठी निधी देण्याची तयारी यावेळी उद्योजकांनी दर्शविली असून, मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आयएएस अधिकारी कसा होईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत़