शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया घालतोय अनेकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:20 IST

नागरिकांच्या व्हॉटस्‌ॲप क्रमांकांवर अनोळखी क्रमांकाहून २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा संदेश येतो. त्यात रेकॉर्ड केलेला ऑडिओ असतो. त्यात लॉटरीचे ...

नागरिकांच्या व्हॉटस्‌ॲप क्रमांकांवर अनोळखी क्रमांकाहून २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा संदेश येतो. त्यात रेकॉर्ड केलेला ऑडिओ असतो. त्यात लॉटरीचे २५ लाख रुपये कोठून मिळणार, ते कोण देणार, याबाबत माहिती असते. बोलणारी व्यक्ती व्हॉटस्‌ॲपकडून बोलत असल्याचे सांगितले जाते. हा इंटनरनॅशनल लकी ड्रॉ असून, मुंबईतील भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांचा क्रमांक आपल्याला पाठविला आहे. या अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यास तुम्हाला २५ लाख रुपये मिळतील. संपर्कासाठी एक क्रमांक दिला जातो. त्यावर केवळ व्हॉटस्‌ॲप कॉलच करावा लागेल, असे सांगण्यात येते. भारतीय राजमुद्रेचा शिक्का, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिक्का, कौन बनेगा करोडपती व काही खासगी चॅनलचे लोगो, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी यांचे फोटोदेखील संबंधित संदेशासोबत असतात. त्याखाली १५, नेताजी सुभाष सडक, कोलकाता, ७०० ००१, भारत, असा पत्ता दिलेला असतो. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर अनेकांना हा संदेश खरा वाटतो. त्यामुळे खरोखर आपण २५ लाख रुपये जिंकलाे असल्याचा त्यांचा समज होतो. दिलेल्या क्रमांकावर व्हॉटस्‌ॲप कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांचे बँक खाते, आधार, पॅन कार्ड याची माहिती मागविली जाते. नागरिकांना बोलण्यात भाळवून त्यांना काही पैसे भरण्यास सांगितले जाते. पैसे भरल्याची खात्री करण्यासाठी बँकेत पैसे भरल्याची पावती पाठविण्यास सांगण्यात येते.

हे पैसे सायबर भामट्यांना मिळाल्यानंतर काही दिवसांत तुमच्या बँक खात्यावर २५ लाख रुपये जमा होतील. याबाबत खात्री देण्यात येते. मात्र, अनेक दिवसांनंतरही पैसे न आल्याने फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. याबाबत काही जण सायबर सेलकडे, पोलीस ठाण्यात तक्रारी करतात. काही जण याबाबत कुठेही तक्रार करत नाहीत.

------

कोट

नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नये. फसवणूक झाल्यास पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. तात्काळ तक्रार दिल्यास गुन्हेगारांना पकडणे सोपे जाते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपास पोलिसांनी लावला आहे.

-राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर