शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रवरानगरला दिले होते मनमोहनसिंग यांनी शेतकरी कर्जमाफीचे संकेत

By सुदाम देशमुख | Updated: December 27, 2024 05:56 IST

स्मरण: पंतप्रधान असताना ८ फेब्रुवारी २००८ रोजी केला होता जिल्ह्याचा दौरा

अहिल्यानगर: पंतप्रधान असताना मनमोहनसिंग यांनी ८ फेब्रुवारी २००८ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे एका समारंभाला हजेरी लावली होती. याच समारंभात त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेचे सूतोवाच केले होते. पुढे केंद्र सरकारने या कर्जमाफीची घोषणा केली.

प्रवरानगर येथे अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मनमोहनसिंग आले होते. या समारंभाला तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार बाळासाहेब विखे पाटील उपस्थित होते.‘देश के सबसे मेहनती और आधुनिक किसान’ अशा शब्दांत त्यांनी त्यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा गौरव केला होता. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहे. सरकारने साखर कारखान्यांसाठी विशेष पॅकेज दिले आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चालू पंचवार्षिक योजनेत तब्बल ३५ हजार कोटींच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जाची मोठी समस्या असून त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असे ते म्हणाले होते. विठ्ठलराव विखे पाटील हे ‘कर्मयोगी’ आहेत असे त्यांनी विखे पाटलांबाबत गौरवोद्गारही काढले होते.

मनमोहनसिंग यांनी जे सूतोवाच केले त्यासंदर्भातील वृत्त ९ फेब्रुवारी २००८ रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर २९ फेब्रुवारी २००८ रोजी मनमोहनसिंग सरकारचा अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शेतकऱ्यांसाठी ६० हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली. मनमोहनसिंग यांच्या निधनानंतर जनतेला त्यांच्या प्रवरानगरमधील घोषणेची व या निर्णयाची प्रकर्षाने आठवण झाली.

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगAhilyanagarअहिल्यानगर