शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईवरुन निघालेल्या वृद्धाचा मनमाड ते राहुरी पायी प्रवास; देसवंडी येथून पाहुण्यांनी दिले हाकलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 15:15 IST

मनमाडवरून तिसगाव (ता. पाथर्डी) येथे जाण्यासाठी वाहन मिळाले नाही. त्यामुळे पायी प्रवास सुरु केला. देसवंडी (ता. राहुरी) येथे पाहुण्यांकडे गेल्यानंतर खंडागळे यांना बघताच पाहुण्यांनी हातांनी खुणावत येथून लवकर निघून जा, असा इशारा केला. त्यामुळे प्रवास करून थकलेल्या वृद्धाला घरात प्रवेश न दिल्याने राहुरी गाठावी लागली. 

राहुरी : मुंबईवरून निघालेला एक वृद्ध मनमाड येथे रेल्वेने पोहोचला. पण लॉकडाऊन लागल्यामुळे मनमाडवरून तिसगाव (ता. पाथर्डी) येथे जाण्यासाठी वाहन मिळाले नाही. त्यामुळे पायी प्रवास सुरु केला. देसवंडी (ता. राहुरी) येथे पाहुण्यांकडे गेलेल्या वृद्धाला घरात प्रवेश न दिल्याने राहुरी गाठावी लागली. सोमवारी रात्री संत गाडगे बाबा आश्रम शाळेत मुक्काम करुन पुन्हा तिसगावकडे प्रयाण करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे जॉन वसंत खंडागळे.जॉन खंडागळे मुंबई येथे मुलगा व सुनेकडे राहत होते. गावी तिसगाव येथे जाण्यासाठी मुंबई ते मनमाड असा रेल्वेने प्रवास केला. मनमाडला आल्यानंतर तिसगावकडे जाण्यासाठी साधन नव्हते. त्यामुळे खंडागळे यांनी पायी प्रवास करत गावी जाण्याचा निर्णय घेतला. राहुरी तालुक्यात आल्यानंतर देसवंडी येथील पाहुण्यांकडे मुक्कामाला जाण्याचा निर्णय घेतला. खंडागळे यांना बघताच पाहुण्यांनी हातांनी खुणावत येथून लवकर निघून जा, असा इशारा केला. प्रवास करून थकलेल्या वृद्धास मुक्काम कोठे करावा, असा प्रश्न होता. पाहुण्यांच्या घराचा दरवाजा बंद झाल्यावर रात्री देसवंडी ते राहुरी असा प्रवास केला. इथे मुक्कामाची व्यवस्था कुठे होईल, असे एका व्यक्तीला विचारले. बंधित व्यक्तीने संत गाडगे बाबा आश्रम शाळेचे नाव सांगितले.जॉन खंडागळे यांनी रात्री संत गाडगेबाबा आश्रम शाळा गाठली. शाळेत राहण्याची व जेवणाची सोय झाली. साधन न मिळाल्याने पायी प्रवास करावा लागला़ प्रवासात कोणीही आपल्याला त्रास दिला नाही. राहुरीत आल्यानंतर नाकाला रुमाल लावण्याची सूचना केली. त्यानंतर नाकाला रुमाल बांधला.

प्रवासात अनेकांची मदत

जॉन खंडागळे लॉकडाऊन लागण्यापूर्वी मनमाडमध्ये पोहोचले होते. मनमाडमध्ये आल्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे त्यांना तिसगावला येण्यासाठी वाहन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पायी प्रवास सुरु केला. प्रवासात त्यांना अनेकांनी मदत केली. मिळेल तिथे आसारा घेत ते राहुरीपर्यंत पोहोचले. राहुरीत आल्यानंतर त्यांनी तोंडावर रुमाल बांधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतली.

आपल्याला गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. शहरापेक्षा आपला गावच बरा. लवकरच मी माझ्या शेतात जाणार आहे. वांबोरीत एक मुक्काम करून मग गावी तिसगावला पोहोचेल.- जॉन खंडागळे, पायी प्रवास करणारा वृद्ध

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस