यादव याने २३ जानेवारी रोजी शहरातील मार्केट यार्ड येथे शोभा सुमतीलाल बाफना यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पळून गेला होता. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हा शहरातील आनंदऋषी हॉस्पिटलजवळ येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली होती. पथकाने सापळा लावून यादव याला मोपेड गाडीसह ताब्यात घेतले. या आरोपीने तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतही मोपेड गाडीवर महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल्याचे तपासात समोर आले तसेच मोपेड गाडी ही आरोपीने औरंगाबाद येथून चोरल्याची कबुली दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे, पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, रवींद्र टकले, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहीद शेख, भारत इंगळे, सुमित गवळी, तान्हाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुशील वाघेला, सूजय हिवाळे, बापूसाहेब म्हस्के, कैलास शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फोटो ३१ आरोपी
ओळी- महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली.