शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांसह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 11:49 IST

नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश पतसंस्थेच्या १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या चालू आर्थिक वर्षात चार लाख २५ हजार ८०३ रुपयांचा गैरव्यवहार आढळून आला.

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश पतसंस्थेच्या १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या चालू आर्थिक वर्षात चार लाख २५ हजार ८०३ रुपयांचा गैरव्यवहार आढळून आला. याप्रकरणी नेवासा सहकारी संस्थेचे उपलेखा परीक्षक अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांसह व्यवस्थापकावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. सुनील बंग, उपाध्यक्ष अभय चंगेडीया, संचालक आनंद भळगट, तेजसकुमार गुंदेचा, गोपाल कडेल, सच्चिदानंद कुरकुटे, विकास जेधे, विजय माकोणे, लक्ष्मी राशिनकर, संध्या जोशी, गुंजन भळगट व व्यवस्थापक श्यामसुंदर खामकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.यापूर्वी २ जानेवारी २०१७ रोजी व्यंकटेश पतसंस्थेतील १ कोटी ९३ लाख ७ हजार रूपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी लेखानिरीक्षक शिरीष कुलकर्णी व लेखापाल सोमाणी यांनी ठेवीदारांच्या रकमेच्या फसवणूक प्रकरणी कर्मचारी, पदाधिकारी व संचालक मंडळावर सोनई पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून केवळ कर्मचाऱ्यांनाच अटक झाली होती. यापैकी दोन कर्मचारी जामिनावर सुटले असून व्यवस्थापक अजूनही अटकेत आहे. मात्र आरोपी पदाधिकारी व संचालकांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. ठेवीदारांना गेल्या तीन वर्षांपासून ठेवी मिळण्याची अपेक्षा आहे.ठेवी प्रकरणी तीन वर्षांपासून आम्ही दाद मागत आहोत. या प्रकरणात राज्य शासनाने लक्ष घालावे. आरोपींना कडक शासन करून व आम्हाला आमच्या ठेवी लवकरात लवकर मिळवून द्याव्यात. -संजय भळगट , ठेवीदार, व्यंकटेश पतसंस्था, सोनई

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा