व्याख्याते गणेश शिंदे यांनी स्मारकाची संकल्पना मंत्री तटकरे व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. कोपरगावचे आ. आशुतोष काळे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यावेळी बैठकीसाठी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारचे स्मारक उभारावे, अशी भूमिका काळे यांनी मांडली. माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम आण्णा शेलार यांनी याकामी विशेष सहकार्य केले. यावेळी तटकरे यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देऊन यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना मांडली.
............भातोडी पारगाव परिसरात ऐतिहासिक लढाई झाली. यात शहाजीराजांचे शौर्य दिसून आले. यात त्यांचे बंधू शरीफजीराजे यांना वीरमरण आले. या ऐतिहासिक परिसरात शहाजीराजांचे शौर्य सतत स्मरणात राहवे यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. पर्यटनमंत्री तटकरे यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- गणेश शिंदे, व्याख्याते, पारगाव