शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक बिनविरोध करा व गावाला २५ लाखांचा निधी घ्या: आ. नीलेश लंके यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:11 IST

पारनेर - नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून ज्या गावातील नागरीक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या खर्च वाचवितील, गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या गावांना आमदार निधीतून 25 लाख रुपये देण्याची घोषणा आमदार नीलेश लंके यांनी केली आहे.

पारनेर : राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी पार पडणार असून सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे. आ. नीलेश लंके यांच्या पारनेर - नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश असून ज्या गावातील नागरीक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या खर्च वाचवितील, गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या गावांना आमदार निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आ. लंके यांनी केली आहे.

 तालुका पातळीवरील राजकारण करणारे पुढारी गावपातळीवर गटबाजी होवो अथवा हाणामाऱ्या होवोत. ग्रामपंचायत निवडणूकीकडे सहसा लक्ष  देत नाहीत. दोन गट एकमेकांत झुंजले तरी आपल्या निवडणूकीला ते आपल्या बाजून कसे उभे राहतील यासाठी ते दोघांनाही गोंजारण्याचे काम करतात. आ. लंके यांनी मात्र गावागावातील पुढाऱ्यांना थेट आवाहन करून ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करा, तुम्हाला गावच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी देतो अशी साद घातली आहे.

     आ. लंके सध्या अधिवेशनानिमित्त मुंबईत आहेत. तेथूनच त्यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी २५ लाखांच्या निधीची घोषणा केली असून तेथून परतल्यानंतर ते स्वतः निवडणूका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी प्रमुख गावांतील गटागटांमध्ये चर्चा करून समेट घडविण्यातही यश मिळविले असून काही मोठया गावांमधील निवडणूका बिनविरोध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

     बिनविरोध निवडणूकीसंदर्भात आ. लंके यांना विचारले असता विधानसभा निवडणूकीचा निकाला जाहिर झाला, त्याच वेळेपासून आपण राजकारण दुर ठेऊन प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास करण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले. निवडणूकीत कोणी मतदान केले किंवा केले नाही याचा हिशेब न पाहता सर्वजण आपले बांधव आहेत, मी कुटूंबप्रमुख म्हणून सर्वांना एकत्र करण्याचा प्रामाणीक प्रयत्न नेहमीच करीत राहणार आहे.

     विशेषतः ग्रामपंचायत निवडणूकीत मोठे वाद होतात. हाणामाऱ्या होतात. त्यातून एकमेकांमध्ये कटूता निर्माण होते. दोन दिवसांच्या निवडणूकीसाठी कटूता निर्माण होऊच नये, सर्वांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध करावी  असा माझा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. 

सरपंच ते आमदार !

     आमदार नीलेश लंके हे सन २००८, ०९ मध्ये हंगे गावचे सरपंच होते. त्यानंतर पत्नी राणी या पंचायत समितीच्या सदस्या, उपसभापती तसेच सध्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यामुळे गावपातळीवरील राजकारण, त्यामुळे होणारे वाद याचा मोठा अनुभव आ. लंके यांच्याकडे आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकीवरून वाद होऊ नये, सर्वजण गुण्या गोविंदाने नांदावेत यासाठी आ. लंके हे मुुंबईवरून परतल्यानंतर विविध ठिकाणी बैठका घेउन बिनविरोध निवडणूका करण्यासाठी बैठका घेणार आहेत. सरपंच पदावरून आमदार पदापर्यंत पोहचलेले आ. लंके हे राज्याच्या विधीमंडळातील काही मोजक्या आमदारांपैकी एक आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर