शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महिला काँग्रेस शहरात उभारणार ‘राईट टू’ चळवळ; स्वच्छता गृहांसाठी करणार पाठपुरावा

By अरुण वाघमोडे | Updated: August 7, 2023 16:31 IST

सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भाकरेंनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये शिवनेरी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला

अहमदनगर : नगर शहरात बाजारपेठ असो की सावेडी, केडगाव, बोल्हेगाव, कल्याण रोड सारखा अन्य उपनगरांचा परिसर. कुठेही महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता गृह उपलब्ध नाहीत. अपवादाने एखादी असलीच तर ती एवढी घाणेरडी असते की यामुळे आजाराचा प्रादुर्भाव त्यातून होतो. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबना होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिला काँग्रेसच्यावतीने शहरात ‘राईट टू पी’ चवळ राबविण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले. 

सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भाकरेंनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये शिवनेरी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. यावेळी काळे बोलत होते. यावेळी भाकरेंसह महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा  भगत, ब्लॉक अध्यक्ष पूनम वनंम, राणी पंडित, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे, आकाश अल्हाट, प्रणव मकासरे सोफियान रंगरेज, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते. भाकरे म्हणाल्या आम्ही महिला बाजारपेठेत खरेदीसाठी, मुलांच्या शालेय कामासाठी तसेच घरातील अन्य कामांसाठी घरातून बाहेर पडलो की तासंतास मोठ्या काळासाठी घराबाहेर राहावे लागते. मात्र या काळात महिलांना स्वच्छता गृह उपलब्ध असू नये ही आम्हा महिलांना प्रचंड मानसिक त्रास देणारी बाब आहे.

काय आहे ‘राईट टू पी’महिलांना शहरात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मोफत, स्वच्छ, सुरक्षित स्वच्छता गृह सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध नाहीत. महिलांच्या हायजिन व आरोग्याच्या दृष्टीने त्या त्यांना देणे ही मनपाची जबाबदारी असून महिलांचा तो अधिकार आहे. शहरातील लाखो महिला, युवतींना हा अधिकार मिळवून देण्यासाठी शहर महिला काँग्रेसने हे अभियान हाती घ्यायचे ठरवले आहे. मुख्य बाजारपेठेसह शहराच्या १७ प्रभागांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किमान ३ अशा एकूण ५१ ठिकाणी किमान १० सीटर स्वच्छता गृह उभारण्याकरिता महिला काँग्रेस मनपाकडे पाठपुरावा करणार आहे. यासाठी संपूर्ण शहराचे महिला काँग्रेस कार्यकर्त्या सर्व्हेक्षण करणार असून काही जागा मनपा प्रशासनाला सुचविणार असल्याची माहिती उषा भगत, सूनिता भाकरे यांनी दिली.