शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी पुण्यतिथी विशेष : अध्ययन केंद्रातून विचारांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:11 IST

जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक थरांतून प्रयत्न झाले.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांनी मांडलेले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक थरांतून प्रयत्न झाले. अनेक विद्यापीठांत गांधी विचारांचा अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेही अनेक महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम सुरू केला. येथील अहमदनगर महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून गांधी अध्ययन केंद्र सुरू आहे. या केंद्राच्या माध्यमातून गांधी विचारांची नव्या पिढीमध्ये पेरणी होत आहे.अहिंसा, शांती, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, साधी राहणी, पर्यावरणरक्षण, आरोग्य, सर्वधर्म समभाव असे त्यांचे एक ना अनेक विचार आजच्या बदलत्या काळात सुसंगत असल्याचे दिसून येते. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे माजी प्रमुख बराक ओबामा हे सुद्धा गांधीजींना त्यांचे आदर्श मानतात. यातूनच गांधी विचाराची व्याप्ती स्पष्ट होते. अशा गांधी विचारांची पेरणी अध्ययन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रा. डॉ. सुनील कवडे, संशोधन सहायक प्रा. फिरोज शेख हे या केंद्राचे कामकाज पाहत आहेत.विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सन २००९मध्ये अहमदनगर महाविद्यालयात गांधी अध्ययन केंद्राला मान्यता दिली. गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करणे या मुख्य उद्देशाने सुरू झालेल्या या केंद्रात सध्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन गांधीयन स्टडिज्’ हा अभ्यासक्रम शिकविला जातो. गांधीवादी विचारवंतांची व्याख्याने, चर्चासत्र, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे गांधीविचार समाजात प्रसूत करण्याचे काम येथे सुरू आहे. यूजीसी दरवर्षी या केंद्रासाठी निधी देते. आतापर्यंत गेल्या आठ वर्षांत १८ लाखांचा निधी मिळालेला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून निधी रखडल्याने महाविद्यालयीन स्तरावरच खर्च भागवला जात आहे. केंद्राने जिल्ह्यातील डिग्रस, जखणगाव, सोनेवाडी, गणेशवाडी, माळीचिंचोरे या शाळा दत्तक घेतल्या असून तेथील विद्यार्थ्यांना गांधी विचारांचे धडे दिले जातात. याशिवाय केंद्रात आतापर्यंत १५० पेक्षा जास्त व्याख्याने, चर्चासत्र झाली आहेत. प्रत्येक महिलादिनी समाजातील वंचित महिलांचा सन्मान केंद्राकडून केला जातो. जालना येथील गांधी विचार शिबिरात दरवर्षी येथील केंद्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. केंद्रामार्फत स्वच्छता अभियान, संविधान जागृतीसाठी प्रभातफेरी असे अनेक उपक्रम राबवले जातात.‘तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नाही, तर विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे.सोन्या-चांदीचे तुकडे नव्हे, तर आरोग्य हीच खरी संपत्ती. भीती तुमच्या शरीराचा रोग आहे. तो तुमच्या आत्म्याला मारतो. त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही. महात्मा गांधीजींच्या अशा एक ना अनेक विचारांनी तरूण भारावलेले आहेत. आमच्या अभ्यास केंद्रातून असेच विचार समाजात पोहोचवण्याचे काम सुरू आहे. - प्रा. डॉ. सुनील कवडे, संचालक, गांधी अध्ययन केंद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर