शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहणार नाही- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 15:39 IST

Maharashtra Election 2019 : कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही

अहमदनगर : कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ही हेडलाइन 24 तारखेला वर्तमानपत्रांची असेल, असा हल्लाबोल राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी भाजपावर केला आहे, ते रोहित पवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या कर्जत-जामखेडच्या सभेत बोलत होते. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कर्जत-जामखेडचीच चर्चा सुरू आहे. या तरुणाने भाजपाची झोप उडवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री तीन-तीन सभा कर्जत-जामखेडमध्ये घेत आहेत, असा टोलाही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. नव्या पिढीला काम नाही. तर दुसरीकडे कारखाने, कंपन्या बंद होत आहेत, अशा पद्धतीची भाजपाची राजवट सुरू आहे, अशी टीकाही पवारांनी केली आहे.52 वर्षांपूर्वी मी आज रोहित ज्या वयात आहे, त्या वयात मी विधानसभेला उभा होता. बारामतीमध्ये त्यावेळी काही नव्हते. त्या गावाचा चेहरा बदलला. परिवर्तन झालं. रोहितने कर्जत-जामखेडची गेली पाच वर्षे जबाबदारी घेतली आहे. या गावाची ओळख दुष्काळी भाग आहे. त्यावेळी दुष्काळ बघायला पंडित नेहरू, इंदिरा गांधी आल्या होत्या. या तरुणाने या विभागाचा चेहरामोहरा कसा बदलला हे बघायला यापुढील दिवसात पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द शरद पवार यांनी यावेळी जनतेला दिला. बारामतीला विकास व्हायला 20 वर्षे लागली. परंतु रोहित ते पाच वर्षांत करून दाखवेल याची मला खात्री आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

 भाजप सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. अनेक उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आघाडीच्या पाठिशी आहे. या निवडणुकीत तरुणांनी  भाजपची झोप उडविली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कर्जत येथे केली. कर्जत-जामखेड मतदार संघात पवारांचे नातू रोहित पवार हे उमेदवारी करीत आहेत. त्यांच्या सांगता सभेसाठी शनिवारी पवार आले होते. पावसामुळे हेलिकॉप्टर लँड होण्यात अडचणी होत्या. त्यामुळे पवार हे कारने कर्जतला आले. पावसामुळे सभास्थळी बसण्यास जागा नव्हती. त्यामुळे लोकांनी उभे राहून सभा ऐकली. सभेत पवारांनी भाजप सरकारवर टीका केली. रोहितला संधी मिळाल्यास कर्जत जामखेडचा बारामतीसारखा विकास करुन दाखवू. कुस्ती खेळताना समोर तगडा प्रतिस्पर्धी हवा. कुस्ती कशी खेळतात हे भाजपवाल्यांना २४ तारखेलाच कळेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019karjat-jamkhed-acकर्जत-जामखेड