कुंकुलोळ व जैन यांनी समाजाचे दायित्व स्वीकारून रुग्ण असलेल्या शहरातील सर्व दवाखान्यांत सकाळ व संध्याकाळ, असे दोन वेळचे जेवणाचे डबे मोफत स्वतः नेऊन देण्याचे व्रत स्वीकारले आहे.
काही रुग्णांनी आमच्या कामासाठी अश्रू वाहिले, हेच कामाचे फलित आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्क केला; पण आम्ही ती नम्रपणे नाकारली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काहीच कमी पडणार नाही. आम्ही दोघे स्वतः सकाळी ३ तास, संध्याकाळी ३ तास शहरातील सर्व दवाखान्यांत डबे वाटपाचे काम करतो. आतापर्यंत ६० डबे दररोज जातात.
कोरोना काळात उद्योगाची अवस्था वाईट झाली असून, लोकांना रोजगार नाही. अनेक अडचणी लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला. याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा व्हावा यासाठी नातेवाइकांनी संपर्क साधावा, असे आवाहन कुंकुलोळ व जैन यांनी केले आहे.
जेवणाची प्रत सुंदर असून, डब्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. संकट काळात आम्ही देशासाठी व समाजासाठी कर्तव्य पार पाडत आहोत, असे कुंकुलोळ म्हणाले.