शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर आगाराचे सव्वातीन कोटींचे नुकसान; दररोज पाच फे-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 16:21 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे संगमनेर आगाराची सेवा तब्बल ६२ दिवस बंद राहिली. या कालावधीत आगाराचे सरासरी ३ कोटी २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

संगमनेर :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे संगमनेर आगाराची सेवा तब्बल ६२ दिवस बंद राहिली. या कालावधीत आगाराचे सरासरी ३ कोटी २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. संगमनेर आगारातून इतर वेळेस दररोज ५१४ फे-या होत होत्या. मात्र आता पुन्हा बससेवा सुरु होेणार असून मोजक्याच फे-या होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा बंद होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यात जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेर आगारातून तब्बल ६२ दिवसांनी बससेवा सुरु होणार आहे.    संगमनेर शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बु्रदूक व कुरण या दोन गावांमध्ये २३ मे रात्री बारा वाजेपर्यंत हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला होता. ही मुदत संपल्यानंतर संगमनेर आगारातून २४ मे पासून जिल्हातंर्गत बससेवा सुरू झाली. आगारातून अहमदनगरकडे दररोज पाच फेºया होतील. यात पहिली बस सक ाळी सात, दुसरी बस सकाळी आठ, तिसरी बस सकाळी अकरा, चौथी बस दुपारी एक तर पाचवी बस दुपारी दीड वाजता सुटणार आहे. अहमदनगरला गेलेल्या बस ठराविक वेळेनुसार पुन्हा संगमनेरकडे रवाना होतील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अहमदनगरकडे जाणा-या व तेथून येणाºया प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. एका बसची आसन संख्या ४४ इतकी आहे. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्याकरिता एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी प्रवास करू शकतील. ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षांखालील मुलांना बस प्रवासाची परवानगी नाही. कोपरगाव, अकोले, अहमदनगर, शेवगाव या आगाराच्या बसेस संगमनेर बसस्थानकात येतील. आलेल्या सर्वच बसचे देखील निर्जंतुकीकरण होणार आहे. बसस्थानकांवर गर्दी होऊ नये याकरिता साखळी पध्दतीने नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व आगार एकमेकांना जोडण्यात आली आहेत. 

प्रवाशांची काळजी घेण्यासाठी सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केल्या आहेत. प्रत्येक प्रवाशाने व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकाने सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करावे. या सर्वांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे, असे संगमनेरचे आगारप्रमुख बी. एन. शिंदे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर