शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या नावाखाली लूट : शिक्षणाधिकारी म्हणतात, ‘ आम्ही काहीच करु शकत नाही !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 10:34 IST

अहमदनगर : मोफत शिक्षणाचा हक्क कायद्याखाली (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण सरकारने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लागू केले आहे. मात्र, ...

अहमदनगर : मोफत शिक्षणाचा हक्क कायद्याखाली (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण सरकारने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लागू केले आहे. मात्र, खासगी शाळांनी शैक्षणिक शुल्काऐवजी इतर शुल्कामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. विशेष म्हणजे हे शुल्क भरले तरच विद्यार्थ्यांना आरटीईतून प्रवेश देण्यात येतो. असाच प्रकार विळद घाट येथील पद्मश्री विखे पाटील फाउंडेशनच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला असून, आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी चक्क ४२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, शिक्षण विभागाकडे तक्रार करुनही शिक्षण विभाग ढिम्म आहे.जिल्ह्यातील ४०० शाळांमधून आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या शाळांमधील ३ हजार ६०६ जागा राखीव असून, त्यापैकी पूर्वप्राथमिक वर्गाच्या २१ आणि प्राथमिकच्या इयत्ता पहिली वर्गाच्या ३ हजार ५८५ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.या राखीव जागांमधून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी ४ हजार ७१८ अर्ज करण्यात आले होते. मात्र, खासगी शाळांनी सर्रास आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दर्शविला असून, शाळांनी ठरविलेले शुल्क पालकांनी भरले तरच प्रवेश देण्यात येतो. मग सरकार मोफत प्रवेशाच्या डांग्याघोड्या का नाचवत आहे, असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

विखे पाटील फाउंडेशनच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रोहिणी विकास नेटके या विद्यार्थिनीचे आरटीईनुसार प्रवेशासाठी आॅनलाईन यादीत नाव आले. मात्र, विकास नेटके जेव्हा अ‍ॅडमिशन घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ४२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. हे ४२ हजार रुपये मेस आणि इतर सुविधांचे सांगण्यात आले. याबाबत विखे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी काही बोलण्यापूर्वीच फोन कट केला. पुन्हा फोनवर त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही़ असेच प्रकार शहरातील अनेक खासगी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरु आहेत. मात्र, शिक्षण विभागाला अद्याप झोपेतून जाग आलेली नाही़ त्यामुळे गरिबांच्या मुलांना प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे.याबाबत नगर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामदास हराळ यांच्याशी संपर्क केला असता ‘‘आरटीईनुसार प्रवेशासाठी सरकार शाळांना फक्त शिक्षण शुल्क देत आहे़ त्यामुळे शाळांनी ठरविलेली फी भरली तरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो़ विखे फाउंडेशनच्या इंग्लिश मीडियम शाळेने त्यांनी ठरविलेले शुल्क मागितले असेल तर त्यात आम्ही काहीही करु शकत नाही़’’ असे सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषदahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय