शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
2
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
3
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
5
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
6
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
7
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
8
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
9
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
10
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
11
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
12
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
13
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
14
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
15
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
16
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
17
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
18
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
19
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
20
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

लोणी खुर्दला चोरट्यांनी दोन घरे फोडली : दीड दोन लाखांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 18:46 IST

लोणी खुर्द (ता.राहाता) येथील विद्यानगर वसाहतीत एका बंगल्यात असलेल्या दोन घरांच्या कडी, कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि २७ हजार रुपये रोख असा दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.२७) मध्यरात्री घडली.

लोणी : लोणी खुर्द (ता.राहाता) येथील विद्यानगर वसाहतीत एका बंगल्यात असलेल्या दोन घरांच्या कडी, कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि २७ हजार रुपये रोख असा दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.२७) मध्यरात्री घडली.मोहन अनाप (रा.सोनगाव ता.राहुरी) यांच्या मालकीच्या बंगल्यात लक्ष्मण भाऊ उगलमुगले (रा.खळी,ता.संगमनेर) व अमजद बालेखान पठाण (रा.हसनापूर,ता.राहाता) या दोघांचेही कुटुंब आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. यातील उगलमुगले हे शिक्षक आहेत. तर पठाण हे सुतार काम व्यावसायिक आहेत. सध्या उन्हाळी सुटी असल्याने हे दोन्ही कुटुंब आपआपल्या गावी गेलेले होते. नेमकी हिच संधी शोधत सोमवारी (दि.२७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हे दोन कुटुंब राहत असलेल्या घरांच्या दरवाज्यांचे कडी-कोयंडे कटरच्या साह्याने तोडत घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची उचकापाचक करीत उगलमुगले यांच्या कपाटातील पंधरा हजार रुपये रोख व तीन तोळे वजनाने गंठण तसेच पठाण यांच्या घरातील कपाटाची उचकापाचक करून दीड तोळ्याचे गंठण व बारा हजार रुपये घेऊन या ठिकाणाहून पोबारा केला.दरम्यान मंगळवारी सकाळी या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी लागलीच ही बाब उगलमुगले व पठाण कुटुंबीयांना कळविली. या घटनेनंतर शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाच्या साह्याने या अज्ञात चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता घटनास्थळापासून दक्षिणेस दोन कि.मी. वर असलेल्या बाभळेश्वर रस्त्यापर्यंत या श्वान पथकाने माग काढला. याठिकानाहून हे चोरटे एखाद्या वाहनाने पसार झाले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. लोणी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस