‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल उर्फ बाबूजी दर्डा यांच्या जयंतीदिनापासून ‘लोकमत’ने राज्यात रक्तदान अभियान सुरू केले आहे. ग्रामस्थांनी गावोगावी शिबिरांचे आयोजन करत रक्ताचा तुटवडा दूर करावा, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पेमगिरीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच खंडू जेडगुले, सदस्य बाळासाहेब म्हस्के, जर्नादन कोल्हे, बबन भुतांबरे, अर्चना वनपत्रे, शालिनी चव्हाण, मंगल गोडसे, सुवर्णा शेटे, करिष्मा शिंदे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष शांताराम डुबे, प्रा. संजय डुबे, सामाजिक कार्यकर्ते भाऊराव बोऱ्हाडे, माधव चव्हाण, रमेश गोडसे, तलाठी सुरेखा कानवडे, ग्रामसेवक भगवान भांड, पानी फाउंडेशनचे भीमाशंकर पांढरे, सतीश कोल्हे, स्वप्नील कोल्हे, विनायक गोडसे यांसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. रक्तदात्यांचा ‘लोकमत’कडून प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे.
पेमगिरीत मंगळवारी ‘लोकमत’चे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST