शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ स्टिंगवर शिक्कामोर्तब : टँकर संस्थांना दहा लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:50 IST

पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकरमध्ये अनियमितता होत असल्याची बाब दोन महिन्यापूर्वी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून निदर्शनास आणली.

अहमदनगर : पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकरमध्ये अनियमितता होत असल्याची बाब दोन महिन्यापूर्वी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून निदर्शनास आणली. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित टँकर संस्थांवर दहा लाखांची दंडात्मक कारवाई केली आहे. ही रक्कम त्यांच्या बिलातून कपात होणार आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने लोकांना वेळेत पाणी मिळत नव्हते. त्यामुळे ‘लोकमत’ टीमने जिल्हाभरातील टँकरची तपासणी केली. यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या. बºयाच टँकरला जीपीसएस यंत्रणाच नव्हती. टँँकरच्या खेपांचा हिशोब ठेवण्यासाठी असलेले लॉगबुकच टँकरचालक भरत नव्हते. काही लॉगबुकवर पाणीपुरवठा समिती सदस्यांच्या सह्या नव्हत्या. काही ठिकाणी मंजूर खेपांपेक्षा कमी खेपा होत होत्या. काही गावांत तलाठी, ग्रामसेवकांचे या प्रक्रियेवर नियंत्रण नव्हते. काही टँकरचे वजन प्रमाणित केलेले नव्हते, तर अनेक ठिकाणी ठरवून दिलेल्या उद्भवाऐवजी दुसºयाच उद््भवावरून दूषित पाणी भरले जायचे. टँकरच्या जाताना-येतानाच्या नोंदी नाहीत. ग्रामसेवक, तलाठी मुख्यालयात नाहीत, अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.या स्टिंगमुळे टँकर ठेकेदारांत खळबळ उडाली. शासकीय अधिकारीही खडबडून जागे झाले. जिल्हा प्रशासनाने तातडीने तपासणी पथके तयार करून काही गावांत जात टँकरमधील अनियमितता पडताळून पाहिली असता, त्यातही तथ्य आढळले.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिका-यांना याबाबत टँकर संस्थांवर दंडात्मक कारवाई निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गटविकास अधिका-यांनी टँकर संस्थांवर जबाबदारी निश्चित करून तो अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला. २९ जून रोजी जिल्हाधिका-यांनी आदेश काढत या टँकर संस्थांना १० लाख ४३ हजार ३४२ रूपयांचा दंड केला आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर