शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत ‘सरपंच अवॉर्ड’चे उद्या होणार थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 13:22 IST

जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ चे बुधवारी (दि. २७) अहमदनगर शहरात बंधन लॉनवर थाटात वितरण होणार आहे.

ठळक मुद्दे१३ विभागांमध्ये सरपंचांना पुरस्कारवाळूचे संवर्धन करणा-या गावांचा विशेष गौरव ‘बबन’ चे दिग्दर्शक साधणार सरपंचांशी संवाद

अहमदनगर: जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ चे बुधवारी (दि. २७) अहमदनगर शहरात बंधन लॉनवर थाटात वितरण होणार आहे. यावेळी ११ ते २ या वेळेत सरपंचांना विविध मान्यवरांची व्याख्याने ऐकायला मिळणार आहेत. सर्व सरपंचांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.‘लोकमत’ सरपंच अवॉर्डचे हे दुसरे वर्ष आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी  प्रस्ताव सादर केलेले आहेत. या प्रस्तावांची विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या ज्युरी मंडळामार्फत छानणीची प्रक्रिया सुरु आहे. पुरस्कार वितरणप्रसंगी आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, पुणे जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष शशिकांत मोरे, राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष अनिल गिते उपस्थित राहणार आहेत. सरपंच गावासाठी काय करु शकतात? यावर हे मान्यवर सरपंच उद्बोधन करणार आहेत. गावाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पाहणाºया व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार विजेत्या सरपंचांना मान्यवरांच्या हस्ते अवॉर्ड प्रदान केले जातील. बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक आहे.नगरची ‘सीएसआरडी’ ही संस्थाही या आयोजनात सक्रीय आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

 १३ विभागांमध्ये सरपंचांना पुरस्कारसरपंचांनी गावात जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन - लोकसहभाग, रोजगार व कृषी या १३ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरंपच आॅफ द ईयर हे दोन पुरस्कारांचेही वितरण होईल. 

वाळूचे संवर्धन करणा-या गावांचा विशेष गौरव जिल्ह्यातील अनेक गावांनी वाळू उपशाला विरोध करुन नद्यांचे व पर्यावरणाचे संरक्षण केले आहे. राज्यासाठी ही आदर्शवत अशी बाब आहे. या गावांच्या लढाईला सलाम करण्यासाठी जिल्ह्यातील अशा निवडक गावांचा ‘लोकमत’च्या वतीने या सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे. 

‘बबन’ चे दिग्दर्शक साधणार सरपंचांशी संवाद‘बबन’ आणि ‘ख्वाडा’ या चित्रपटांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनावर भाष्य केलेले  दिग्दर्शक भाऊराव कºहाडे हेही सरपंच अवॉर्ड सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. सरपंचांशी ते संवाद साधणार आहेत

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर