शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

लोकमत सरपंच अवॉर्ड : बेलवंडीच्या सुप्रिया पवार ‘सरपंच आॅफ द इयर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 19:55 IST

‘सरपंच खरा, घेई मानाचा तुरा’ या टॅगलाईनबरोबर संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’च्या दुसऱ्या पर्वाचे वितरण २७ फेब्रुवारी रोजी शहरातील बंधन लॉनमध्ये थाटात झाले.

अहमदनगर : ‘सरपंच खरा, घेई मानाचा तुरा’ या टॅगलाईनबरोबर संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’च्या दुसऱ्या पर्वाचे वितरण २७ फेब्रुवारी रोजी शहरातील बंधन लॉनमध्ये थाटात झाले. याप्रसंगी यंदाचा सरपंच आॅफ द इयर हा मानाचा पुरस्कार श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावच्या सरपंच सुप्रिया संग्राम पवार यांना प्रदान करण्यात आला. ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १३ सरपंचांना ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले.बीकेटी टायर्स हे मुख्य प्रायोजक व पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक असलेला हा भव्य सोहळा सुमारे तीन तास चालला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, दिग्दर्शक भाऊराव कºहाडे, राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गिते, शास्त्रज्ञ अशोक ढगे, नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, गुंडेगावचे सरपंच संजय कोतकर, बीकेटीचे महाराष्ट सेल्स मॅनेजर जुबेर शेख, बीकेटीचे जिल्हा वितरक कनवरजित सिंग बंगा उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके व उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविकात लंके यांनी या सोहळ्याचा उद्देश विषद केला. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाभरातून सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.‘लोकमत’ने सन्मानित केलेले विजेते सरपंचसरपंच आॅफ द इयरसुप्रिया पवार बेलवंडी, ता. श्रीगोंदाउदयोन्मुख नेतृत्ववैभाली आभाळे मढी खुर्द, ता. कोपरगावशैक्षणिक सुविधासुनंदा भागवत नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेरस्वच्छतास्वाती न-हे वडनेर, ता. पारनेरआरोग्यउषाबाई बर्डे कुरणवाडी, ता. राहुरीपायाभूत सेवाधनेश गांगर्डे मांदळी,ता. कर्जतजल व्यवस्थापनकैलास पटारेडोंगरगण, ता. नगरवीज व्यवस्थापनरेखा कात्रजकरकुसडगाव,ता. जामखेडकृषी तंत्रज्ञानअश्विनी थोरातपिंंपरी गवळी, ता. पारनेररोजगार निर्मितीगोपीनाथ सोनवणेवेल्हाळे,ता. संगमनेरउदयोन्मुख नेतृत्वविजय बोरूडेमाळी बाभूळगाव, ता. पाथर्डीपर्यावरण संवर्धनअनुजा काटेहिवरेझरे,ता. नगरग्रामरक्षणभरत बेल्हेकर बेल्हेकरवाडीता. नेवासा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत