शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

लोकमत संवाद/ शहराच्या पर्यटनाचा अजेंडा ठरवावा लागेल - जयंत येलूलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:22 IST

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.ते म्हणाले,  शहराच्या एका वर्धापनदिनी आम्ही भिस्तबाग महालावर विद्युत रोषणाई केली होती. त्यावेळी ही वास्तू इतकी अप्रतिम दिसत होती की ते चित्र पाहून नगरकर आचंबित झाले. सर्व ऐतिहासिक वास्तूंचे आपण असे जतन केले व कल्पकता वापरुन त्यांचा विकास केला तर पर्यटक नगरला गर्दी करतील. भुईकोट किल्ला पाहण्यासाठी दूरवरून लोक येऊ शकतात. तेथे वीज, पाणी यांचा वापर करुन रात्री काही सांस्कृतिक ‘शो’ सुरु करता येऊ शकतो. या किल्ल्याभोवती मोठे खंदक आहेत त्याचाही अप्रतिम वापर करुन घेता येईल. पर्यटनस्थळे विकसित झाली की आपोआप छोटे-मोठे व्यवसाय, हॉटेल, रिक्षा, ट्रॅव्हल एजन्सी यांना रोजगार मिळेल. आपण गावातील रस्ते चांगले केले व पर्यटनस्थळे विकसित केली तरी शहर कितीतरी बदलेल. हे काम फार अवडघ नव्हे. केवळ इच्छाशक्ती हवी आहे. या वर्षभराचा अजेंडा ठरविण्यासाठी ‘लोकमत’ने खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. भाराभर अपेक्षा नोंदवून उपयोग नाही. माझ्या मते पर्यटनाचा आराखडा आपण निर्माण केला व वाडिया पार्कचा गुंता सोडविला तरी दोन मोठे प्रश्न मार्गी लागतील. नगरची पर्यटन स्थळे विकसित केल्यास शिर्डी, शिंगणापूरला जाणारे पर्यटक नगरमध्ये थांबतील. त्यातून अर्थचक्र फिरु शकेल, असेही ते म्हणाले.    अहमदनगर शहराच्या विकासाबाबत आजवर चर्चाच खूप झाली. आता ठोस कृती कार्यक्रम हवा आहे. या वर्षात  किमान नगरच्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सरकारने कृती आराखडा ठरविला तरीही विकासाच्यादृष्टीने मोठे पाउल पडेल. हे वर्ष पर्यटनस्थळांच्या विकासाभोवती केंद्रित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.