शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

Lok Sabha Election 2019 : या आहेत... मतदान न चुकविणा-या आजीबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 15:54 IST

इंग्रजांचे राज्य होते, ते गेले अन मतदानाची संधी मिळाली़ ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकीत मतदान करता आले़ नेमके कोणत्या साली मतदान केले हे मात्र आठवत नाही, असे उद्गार आहेत ९० वर्षीय भागुबाई येवले यांचे़

राहुरी : इंग्रजांचे राज्य होते, ते गेले अन मतदानाची संधी मिळाली़ ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकीत मतदान करता आले़ नेमके कोणत्या साली मतदान केले हे मात्र आठवत नाही, असे उद्गार आहेत ९० वर्षीय भागुबाई येवले यांचे़कुठल्याही शाळेत न गेलेल्या भागुबाई येवले यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबरोबरच राहुरी ग्रामपंचायत, राहुरी कारखाना, सहकारी सोसायट्या आदी ठिकाणी न चुकता मतदान केले आहे़ महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही येवले यांना ऐकून माहिती आहे़ मतदान केल्यानंतर जास्त मत मिळविणारा निवडून येतो व कमी मत मिळविणारा पडतो एवढीच माहिती त्यांना आहे.पूर्वीच्या काळी मतदान करणे हे प्रतिष्ठेचे समजले जात होते़ चित्रावर फुली मारायची एवढे कामही धाडसाचे वाटायचे़ शिक्क्याची जागा मतदान यंत्राने घेतली़ मतदान करता येईल का नाही याची खात्री नव्हती़ परंतु चित्रापुढे बटन दाबून मतदान करता आले़ आवाज आला की मतदान झाले हे अधिकाऱ्यांनी सांगितलेला शब्द आठवतो़ मग आपण समजायचे की आपले मतदान बरोबर झाले़ दिवसेंदिवस मतदान करणे वयोमानानुसार अवघड वाटते़ यंदाही मतदान करणार असल्याचे भागुबाई येवले यांनी सांगितले़ अलीकडील काळात मतदानाचे पैसे वाटले जातात याबाबत विचारले असता, मत हे दान करायचे असते़ पैसे न घेता मतदान केले पाहिजे़ त्यामुळे चांगली माणसे निवडून येतील़ मतदानाचे कधीही पैसे घेतले नसल्याचे भागुबाई येवले यांनी सांगितले़महापूर आला अन् मोसंबीची जागा उसाने घेतलीराहुरीची मोसंबी परदेशात प्रसिध्द होती़ इंग्रजांना राहुरीची मोसंबी खूप आवडायची़ ते गाडीत बसून मोसंबी तोडायला यायचे़ त्यांना बघितले की शेतकरी घराचे दरवाजे बंद करून बसायचे़ इंग्रजांना कुणीही शेतकरी विरोध करीत नसे़ १९४६ मध्ये मुळा नदीला महापूर आला व राहुरी वाहून गेले़ त्यानंतर मोसंबीची जागा उसाने घेतली़, अशी आठवणही येवले यांनी सांगितली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर