शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : दहशतीमुळे औद्योगिक विकास खुंटला : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 11:47 IST

दहशतीमुळे अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीतील कारखाने दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेले़ त्यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले.

अहमदनगर : दहशतीमुळे अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीतील कारखाने दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेले़ त्यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले. औद्योगिक वसाहतीचा उपयोग राजकारणासाठी केला गेल्याची टीका महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी नगर तालुक्यातील दौऱ्यात केली़ तसेच या औद्योगिक वसाहतीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले़लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नगर तालुक्यातील जखणगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती सदस्य रामदास भोर, बाळासाहेब हराळ, अरूण होळकर आदी उपस्थित होते. विरोधकांवर तोफ डागताना विखे म्हणाले, अहमदनगर औद्योगिक वसाहतीला उच्च दर्जा प्राप्त झाला होता. नगरच्या औद्योगिक वसाहतीत मोठे कारखाने सुरू होते़ मात्र स्थानिक नेत्यांनी युनियनच्या नावाखाली दहशत निर्माण केली़ त्यामुळे त्रस्त उद्योजक कारखाने बंद करून निघून गेले़ पुरेशा पायाभूत सुविधा असताना येथील वसाहत ओस पडली़ परिणामी तरुणांच्या हाताला काम राहिले नाही़ विरोधकांनी यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठविला नाही़ त्यामुळेच नगरचा औद्योगिक विकास खुंटल्याचे विखे म्हणाले़जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये युवक उच्च शिक्षण घेत आहेत़ परंतु, त्यांना जिल्ह्यात रोजगार मिळत नाही़ त्यामुळे त्यांना नोकरीसाठी शेजारच्या जिल्ह्यात जावे लागते़ शिक्षण पूर्ण केलेले हजारो विद्यार्थी दरवर्षी नोकरीसाठी पुणे, मुंबईत दाखल होत आहेत़ पण, यापुढे तरुणांना नोकरीसाठी परजिल्ह्यात जाण्याची आवश्यकता पडणार नाही़ या जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीचा आराखडा तयार करून औद्योगिक वसाहतीचा दर्जा उंचावणार असल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले़ नगर तालुक्यातील निमगाव वाघा, नेप्ती, हमीदपूर, जखणगाव, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा आदी भागातील मतदारांशी विखे यांनी संवाद साधला़ यावेळी विजय औटी यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर