शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : मतदान यंत्र तोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 15:03 IST

ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या जालिंदर चोभे यांनी मंगळवारी दुपारी बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी वस्तू मशीनवर मारून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देजालिंदर चोभे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन प्रणाली विरोधात लढा सुरू आहे. ईव्हीएम मशीन विरोधात त्यांनी यापूर्वी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. जालिंदर चोभे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अहमदनगर - ईव्हीएम मशीन विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढणाऱ्या जालिंदर चोभे यांनी मंगळवारी (२३ एप्रिल) दुपारी बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रात लोखंडी वस्तू मशीनवर मारून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. त्याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.

जालिंदर चोभे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन प्रणाली विरोधात लढा सुरू आहे. या ईव्हीएम मशीन विरोधात त्यांनी यापूर्वी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. तसेच भारतीय निवडणूक आयोगाला वारंवार लेखी स्वरूपात निवेदनही दिलेली आहेत. आज सकाळी ते बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यांनी जाताना खिशात कुठलीतरी टणक लोखंडी वस्तू नेली होती. 

मतदान यंत्राजवळ मतदानासाठी आत गेल्यावर त्यांनी सदर वस्तू बाहेर काढली. ती जोरात मशीनवर  मारली. एकदम आवाज येताच तेथे नियुक्तीस असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली व त्यांना पकडले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चोभे यांना सरकारी वाहनात नेले. तेथून नगर तालुका पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी जालिंदर चोभे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोभे यांनी ईव्हीएम मशीनचा निषेध करण्यासाठी मतदान मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याने निवडणूक अधिकारी व कर्मचारी घाबरून गेले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान होणार असून, त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. यात मंत्री गिरीश बापट, सुजय विखे-पाटील, तसेच राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आदी दिग्गज रिंगणात आहेत. या टप्प्यात १९ महिला उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक ४ महिला बारामतीतून भाग्य आजमावत आहेत. पुणे व बारामतीमध्ये प्रत्येकी ३१ उमेदवार आहेत. या टप्प्यासाठी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अनेक सभा घेतल्या.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर