अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत आता कुठे रंगत येण्यास सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्यासाठी आज (गुरूवार) शेवटचा दिवसअसल्याने अजूनही अर्ज दाखल होऊ शकतात. आतापर्यंत नगर मतदारसंघात १२ जणांनी १६ अर्ज दाखल केले आहेत. शिर्डीत केवळ एकच अर्ज दाखल आहे. दरम्यान, नगरमध्ये भाजपचे सुजय विखे व राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात मुख्य लढत होत आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी २८ मार्चला अर्जप्रक्रिया सुरू झाली. पहिल्या चार दिवसांत विशेष अर्ज दाखल झाले नाहीत. मात्र सोमवारी भाजपचे सुजय विखे यांनी तीन अर्ज दाखल केले. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांनी एक अर्ज दाखल केला. जगताप यांनी एकूण तीन अर्ज नेलेले आहेत. त्यामुळे गुरूवारी उर्वरित दोन अर्ज ते भरू शकतात. याशिवाय संजीव भोर यांनी अपक्ष व संजय सावंत यांनी बहुजन मुक्ती पार्टीकडून एक अर्ज भरलेला आहे.दरम्यान, बुधवारी एकूण ९ जणांनी १० अर्ज दाखल केले. त्यामध्ये सुधाकर आव्हाड (वंचित बहुजन आघाडी), कलीराम पोपळघट (भारतीय नवजवान सेना), तर ज्ञानदेव सुपेकर, गणेश शेटे, गौतम घोडके, साईनाथ घोरपडे, संदीप सकट, संजीव भोर, सुदर्शन शितोळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले. बुधवारी आठजणांनी ११ अर्ज नेले.
Lok Sabha Election 2019: अर्ज दाखलसाठी आज अखेरचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:52 IST