शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Lok Sabha Election 2019: अपक्षही उतरणार रणांगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:32 IST

नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांसह विविध आघाड्या व इतर पक्षही रिंगणात उतरणार आहेत.

अहमदनगर/ श्रीरामपूर : नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांसह विविध आघाड्या व इतर पक्षही रिंगणात उतरणार आहेत. शिर्डीत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी उमेदवारी करण्याची घोषणा केली आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेना-भाजपमध्ये बंडखोरी केल्यानंतर आता गायकवाड यांच्या रूपाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही बिघाडी झाल्याचे चित्र आहे.आंबेडकरी चळवळीतील नेते गायकवाड यांनी श्रीरामपुरात पत्रकार परिषदेत उमेदवारीची घोषणा केली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. सादिक शिलेदार, भाऊसाहेब पगारे, राजेंद्र साठे, राजेंद्र वाघ, बाळासाहेब शिंदे, पोपटराव पुंड आदी उपस्थित होते. शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आघाडीकडून आपल्याला उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. माजी खासदार यशवंतराव गडाख यांनीही त्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार गेली दोन महिने आपण तयारी केली होती, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील गटबाजीमुळे ऐनवेळी येथे कांबळे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. राज्यात सर्व जागांवर आपण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत आहोत. मात्र शिर्डीत मैैत्रीपूर्ण लढत करणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही याबाबत कल्पना दिली आहे, असे ते म्हणाले.घराणेशाहीविरोधात माझी उमेदवारी: सावंतमहाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्यामाजी सभापती अ‍ॅड़ कमल सावंत आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत़ नगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणार असल्याची घोषणा त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली़ घराणेशाहीच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपली उमेदवारी असल्याचे त्या म्हणाल्या. उमेदवारीसाठी कोणीही उठतो, कोणत्याही पक्षात प्रवेश करतो आणि त्याला तिकिटही दिले जाते़ हे म्हणजे आयपीएलच्या सामन्यांसारखे झाले आहे़, अशी टीका त्यांनी केली.सर्वच पक्षांनी समाजाला फसविले: भोरराजकीय सत्तेच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चा, शेतकऱ्यांचा संप दडपण्यात आला आहे. नेते केवळ समाजाचा वापर करतात. त्यामुळे प्रस्थापित व घराणेशाही विरोधात आपली लढाई असल्याचे शिवप्रहारचे प्रमुख संजीव भोर यांनी नगर येथे बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रहार व मराठा मोर्चातील कार्यकर्ते, तसेच विविध सामाजिक संघटनांची बैठक नगर शहरात झाली. या बैठकीत भोर यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, विजय काकडे, प्रदीप बिल्लोरे, राहुन बनसोडे, शिवाजी चौधरी, मंगेश अजबे, अनिल देठे, सचिन चौगुले, बाळासाहेब पठारे आदींची उपस्थिती होती. अलीकडच्या काळात घराणेशाहीच्या वारसदारांनी सत्ता आणि संपत्तीच्या माध्यमातून पुन्हा सरंजामशाही प्रस्थापित केली़ एका घरात अनेक राजकीय पदे असताना त्यांच्याच घरातील उमेदवार दिले जात असल्याची टीका रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केली़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९