शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : शिर्डीत वंचित आघाडीने बदलला उमेदवार : संजय सुखदान रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:52 IST

वंचित बहुजन आघाडीने शिर्डी मतदारसंघातील उमेदवार डॉ.अरुण साबळे यांची उमेदवारी अचानक रद्द केली आहे.

श्रीरामपूर : वंचित बहुजन आघाडीने शिर्डी मतदारसंघातील उमेदवार डॉ.अरुण साबळे यांची उमेदवारी अचानक रद्द केली आहे. या जागी नेवासे येथील आंबेडकरी चळवळीतील नेते व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय सुखदान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.आघाडीने येथे डॉ.साबळे यांची उमेदवारी जाहीर केली होती. शिर्डीत सर्वप्रथम आघाडीनेच आपला उमेदवार घोषित केला होता. डॉ.साबळे हे शासकीय रुग्णालयातील सेवानिवृत्त वैैद्यकीय अधीक्षक होते. ते राहाता येथे व्यवसाय पाहत होते. अकोले, संगमनेर येथे त्यांनी काही काळ नोकरी केली.दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे डॉ.साबळे यांना आपली उमेदवारी गमवावी लागली आहे. त्यांनी यापूर्वी सरकारकडे पूर्ववत पदावर रुजू होण्याकरिता अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकारकडून नुकतीच कार्यवाही करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी ही बाब माहीत नव्हती. आता उशिराने हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे तांत्रिक अडचण लक्षात घेऊन नाईलाजास्तव उमेदवार बदलावा लागत असल्याची माहिती आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.जालिंदर घिगे यांनी दिली.नेवासे येथील सुखदान हे गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मंगळवारी दुपारी सुखदान हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष पी.डी.सावंत, किसन चव्हाण, किरण साळवी आदी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी