शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : मी केलेल्या कामांचा हा घ्या हिशोब : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 11:52 IST

शहरासह ग्रामीण भागासाठी साडेचार वर्षांत काय कामे केली, या विरोधकांनी केलेल्या आरोपाला नगर तालुक्याच्या विकासासाठी १५ कोटींची कामे केली, असे सांगून राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अहमदनगर : शहरासह ग्रामीण भागासाठी साडेचार वर्षांत काय कामे केली, या विरोधकांनी केलेल्या आरोपाला नगर तालुक्याच्या विकासासाठी १५ कोटींची कामे केली, असे सांगून राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी या कामांची यादीच जाहीर केली़लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नगर तालुक्यातील नागापूर औद्योगिक वसाहतीमधील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, प्रताप शेळके, माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, निलेश लंके, रावसाहेब शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उध्दव दुसुंगे, किसनराव लोटके, सबाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते. या मेळाव्यास रमेश भांबरे, वसंतराव ठोकळ, संजय जपकर, वसंत पवार, अरुण ठाणगे, आसाराम कातोरे, सूर्यभान पोटे, डॉ. बबनराव डोंगरे, घनश्याम म्हस्के, देवा होले, सुनील कोठावळे, ज्ञानदेव दळवी, साहेबराव बोडखे, गोरख दळवी, बाबासाहेब गुंजाळ, गणेश साठे, दादासाहेब दरेकर, नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, शिवाजी चव्हाण, सतीश बारस्कर, दत्तू जगताप, दत्ता तापकिरे, गजानन भांडवलकर आदी उपस्थित होते़ आ़ जगताप यांनी यावेळी विरोधकांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले़ ते म्हणाले, केडगावच्या अंबिका हॉटेलपासून ते सोनेवाडी, अकोळनेर ते सारोळा कासार या रस्त्यासाठी सुमारे २ कोटी ५२ लाख रुपये, तपोवन रस्त्यासाठी ३ कोटी, केडगाव लिंकरोड रस्त्यासाठी २ कोटी २५ लाख, कायनेटिक ते बुरूडगाव रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख, एम.आय.डी.सी. ते निंबळक रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख, नालेगांव भागातील वारुळाचा मारुती ते निंबळक या जुन्या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी २ लाख ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर शहरातून परिसरातील गावात जाणाऱ्या व परिसरातील गावातून शहरात येणाऱ्या नागरिकांची सोय होणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर