शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Lok Sabha Election 2019 : राज्यात सर्व जागा भाजपला मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको : गिरीश महाजन यांचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:57 IST

देशात व राज्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. लोक भाजपच्या सोबत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळाल्या तरी आश्यर्च वाटायला नको, असे आत्मविश्वासाने सांगत शरद पवारांनी कितीही जोर लावला तरी नगरच्या जागेवर सुजय विखे यांचा विजय पक्का आहे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगरमध्ये सांगितले.

अहमदनगर : देशात व राज्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. लोक भाजपच्या सोबत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळाल्या तरी आश्यर्च वाटायला नको, असे आत्मविश्वासाने सांगत शरद पवारांनी कितीही जोर लावला तरी नगरच्या जागेवर सुजय विखे यांचा विजय पक्का आहे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगरमध्ये सांगितले.सोमवारी दुपारी विखे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाजन माध्यमांशी बोलत होते. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे असून, येथील सर्व आठ जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असे सांगत महाजन यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. आघाडी म्हणून, पक्ष म्हणून एवढेच काय कुटुंब म्हणूनही विरोधकांत एकमत नाही. पुण्यासह अनेक ठिकाणी अद्याप त्यांना उमेदवारही मिळेलेले नाहीत. इतिहासात झाली नव्हती एवढी वाईट अवस्था आज विरोधकांची झाली आहे, असा टोला महाजन यांनी मारला.सुजय विखे यांनीही विजयाचा दावा केला. अर्ज भरताना आपले आई-वडील उपस्थित नसल्याबद्दल विखे यांना पत्रकारांनी विचारले असता, भाजप हेच माझे कुटुंब आहे. मंत्री महाजन यांनी वडिलांची उणीव भासू दिली नाही, पालकमंत्री तर माझे पालकच आहेत, असे विखे म्हणाले. संघटना म्हणून भाजप पक्ष काम करतो. येथे सर्व नेते, कार्यकर्ते एकसंघ असतात, नाराजी कोणाचीही नसते, त्यामुळेच आज अर्ज भरताना खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजपचे, तसेच शिवसेना व मित्रपक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी हजेरी लावली, असे विखे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर